IMD Weather Update : पुढील 48 तासांमध्ये महाराष्ट्रावर मोठं संकट, 7 जिल्ह्यांना हाय अलर्ट, पावसाचा मोठा इशारा

Mar 20, 2026 - 21:07
 0  12
IMD Weather Update : पुढील 48 तासांमध्ये महाराष्ट्रावर मोठं संकट, 7 जिल्ह्यांना हाय अलर्ट, पावसाचा मोठा इशारा

दोन ते तीन दिवसांपासून राज्यात पाऊस सुरू आहे. दरम्यान आता हवामान विभागानं वर्तवलेल्या नव्या अंदाजामुळे चिंता आणखी वाढली आहे. पुढील दोन दिवस राज्यात पावसाचा जोर कायम राहणार आहे.

महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचं संकट कायम आहे, यामुळे आता शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. गेल्या चार ते पाच दिवसांमध्ये राज्यातील अनेक भागात गारपीटीसह पावसानं हजेरी लावली आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) ने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील तीन ते चार दिवस गारपीटसह पावसाचं संकट काय आहे. 21 मार्च ते 25 मार्च दरम्यान राज्यातील अनेक भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्य स्वरुपाच्या पवासाची शक्यता आहे. उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

विदर्भात पावसाचा इशारा  

विदर्भात काही जिल्ह्यात गारपीटसह अवकाळी पावसाची शक्यता आहे. तर काही ठिकाणी तुरळक पाऊस पडल्यानं ढगाळ वातावरणाची निर्मिती झाली आहे. पुढील दोन दिवस विदर्भात अवकाळी पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाच्या नागपूर केंद्राकडून वर्तवण्यात आला आहे. तर काही भागात गारपिटीची देखील शक्यता आहे.

गेल्या आठवड्यामध्ये विदर्भात उष्णतेचा ”यलो अलर्ट देण्यात आला होता. या काळात विदर्भातील बहुतांश जिल्हाचे तापमान 40 डिग्रीच्यावर गेले होते. अती तीव्र उष्णतेचा परिणाम नागरिकांच्या दैनंदिन कामकाजावर देखील झाल्याचं पहायला मिळालं. मात्र याचदरम्यान अवकाळी पावसानं हजेरी लावल्यानं नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. विदर्भाच्या वातावरणात द्रोनीका (अप्पर टफ वे) तयार झाली आहे, त्यामुळे 22 मार्चपर्यंत विदर्भातील बहुतांश भागात अवकाळी पावसासह गारपीट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे, अशी माहिती नागपूर हवामान विभागाचे शास्त्रज्ञ प्रवीण कुमार यांनी दिली आहे.

दरम्यान दुसरीकडे इतरही काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे, यामध्ये गोंदिया, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांचा समावेश आहे. या जिल्ह्यांमध्ये पुढील एक ते दोन दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे. दरम्यान पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. आधीच दोन ते तीन दिवसांपासून सुरू झालेल्या पावसामुळे मोठं नुकसान झालं आहे, त्यामुळे चिंता वाढली आहे

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0