अमरावती शहर पोलीस दलात पदोन्नतीचा आनंदोत्सव
अमरावती शहर पोलीस दलात पदोन्नतीचा आनंदोत्सव
अमरावती शहर पोलीस आयुक्तालयातील अनेक अधिकाऱ्यांना पदोन्नती मिळाल्याने पोलीस दलात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. मा. पोलीस आयुक्त श्री. राकेश ओला यांच्या हस्ते पदोन्नत अधिकाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
मनोज कुमार कृष्णराव मानकर व प्रियंका विवेकशव कोटावार यांची पोलीस निरीक्षक पदावर पदोन्नती झाली. तर रविंद्र पांडुरंग ताले, दिपक सारंगधर राणे, गजानन विजय अन्सापुरे, अजय मुलचंद जाधव, धनंजय रमेशराव रत्नपारखी, निरंजना ज्योतीराम उमाळे व अमित सिद्धेश्वर बकतवार यांची सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर निवड झाली.
पदोन्नती समारंभ “पिपिंग सेरेमनी”च्या माध्यमातून कौटुंबिक वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी पोलीस उपायुक्त श्री. रमेश धुमाळ, पोलीस निरीक्षक श्री. निलेश करे तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0