संत गाडगेबाबा चौकाला मिळाला मानाचा दर्जा; समाजाच्या एकजुटीचा विजय
संत गाडगेबाबा चौकाला मिळाला मानाचा दर्जा; समाजाच्या एकजुटीचा विजय
मूर्तीजापूर
मूर्तीजापूर येथील अकोला बायपास नाका परिसरात 'श्री संत गाडगेबाबा चौक' फलकाचे लोकार्पण उत्साहात पार पडले. संत गाडगेबाबा यांच्या विचारांचा सन्मान राखण्यासाठी समाजबांधवांनी केलेल्या दीर्घ प्रयत्नांना अखेर यश मिळाल्याने परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
कार्यक्रमात उपस्थितांनी चौकाचे पावित्र्य जपण्याचा निर्धार व्यक्त करत कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण अथवा अनुचित व्यावसायिक उपक्रम सहन केले जाणार नसल्याचे स्पष्ट केले. चौकाच्या संरक्षणासाठी समाज भविष्यातही एकजुटीने उभा राहील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
या उपक्रमात स्मारक समितीचे पदाधिकारी, संत गाडगेबाबा विचारप्रेमी, विविध सामाजिक कार्यकर्ते तसेच सर्वपक्षीय प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. चौकाचे सुशोभीकरण करून तो प्रेरणास्थळ म्हणून विकसित करण्याचा संकल्पही यावेळी व्यक्त करण्यात आला.
महापुरुषांच्या विचारांचा गौरव आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देणारा हा सोहळा मूर्तीजापूरच्या इतिहासातील संस्मरणीय क्षण ठरला.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0