जे अँड डी मॉलची उपमहापौर व गटनेत्यांकडून पाहणी; दुरवस्थेवर तीव्र नाराजी, बिल्डरला इशारा
जे अँड डी मॉलची उपमहापौर व गटनेत्यांकडून पाहणी; दुरवस्थेवर तीव्र नाराजी, बिल्डरला इशारा
अमरावती : जे अँड डी मॉलमधील पार्किंग आणि इमारतीच्या दुरवस्थेबाबत स्थानिक व्यापाऱ्यांकडून वारंवार तक्रारी प्राप्त झाल्यानंतर आमदार रवी राणा यांच्या निर्देशानुसार अमरावती महानगरपालिकेचे उपमहापौर सचिन भाऊ भेंडे आणि गटनेते नाना आमले यांनी मॉलची प्रत्यक्ष पाहणी केली.
पाहणीदरम्यान मॉलमधील पार्किंग तसेच इतर भागांची अत्यंत दयनीय अवस्था पाहून त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. व्यापाऱ्यांनीही बिल्डरच्या निष्काळजीपणाबाबत संताप व्यक्त करत विविध समस्यांकडे अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले.
या पाहणीवेळी महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख, उपायुक्त नरेंद्र वानखडे, कार्यकारी अभियंता कांबळे, शहर अभियंता रवींद्र पवार, अतिरिक्त अतिक्रमण विभाग प्रमुख योगेश कोल्हे, बाजार परवाना विभागाचे उदय चव्हाण, डॉ. जाधव यांच्यासह मनपाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी संबंधित बिल्डरने मॉलमधील सर्व दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करावीत, अन्यथा जे अँड डी मॉल महानगरपालिका स्वतःच्या ताब्यात घेऊन पुढील कार्यवाही करेल, असा इशारा देण्यात आला.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0