अखेर युद्धविराम, डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा, ३४ वर्षांनंतर नेते एकत्र भेटले

Apr 16, 2026 - 23:09
 0  3
अखेर युद्धविराम, डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा, ३४ वर्षांनंतर नेते एकत्र भेटले

ट्रम्प म्हणाले की, मंगळवारी, ३४ वर्षांत प्रथमच, दोन्ही देशांचे प्रतिनिधी येथे वॉशिंग्टन, डीसीमध्ये आमचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांच्यासोबत भेटले. या दोन्ही देशांच्या नेत्यांनी शांतता प्रस्थापित करण्यासाठी सीजफायरवर सहमती व्यक्त केली आहे.

युद्धाने पोळलेल्या पश्चिम आशियातून आणखी एक चांगली बातमी आली आहे. लेबनॉन आणि इस्रायलने १० दिवसांचा युद्धविराम घोषीत केला आहे. या सीजफायरची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या सीजफायरची घोषणा करताना सांगितले की आताच माझी लेबनॉनचे अत्यंत सन्मानित राष्ट्राध्यक्ष जोसेफ ऑन आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्याशी चांगली बोलणी झाली आहेत. या दोघांनी दोन्ही देशात शांतता प्रस्थापित करण्यासाठी औपचारिक रुपाने १० दिवसांचा युद्धविरामाची सुरुवात करण्यास होकार दिला आहे. अमेरिकन वेळेनुसार युद्धविराम सायंकाळी ५ वाजल्यापासून लागू होईल. इस्रायली हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या लेबनॉनींची संख्या २,१९६ इतकी झाल्यानंतर हा युद्धविराम घोषीत झाला आहे.

ट्रम्प यांनी म्हटले आहे की,’ इस्रायलचे पंतप्रधान बीबी नेतान्याहू आणि लेबनॉनचे राष्ट्राध्यक्ष जोसेफ ऑन यांना व्हाईट हाऊसमध्ये आमंत्रित करु. ही साल १९८३ नंतर इस्रायल आणि लेबनॉनमधील पहिली सार्थक चर्चा असेल. दोन्ही पक्षांना शांतता हवी आहे आणि मला वाटते असेच होईल आणि तेही खूपच लवकर.’

संघर्ष लवकरात लवकर थांबवलाच पाहिजे – लेबनॉन

दरम्यान, लेबनॉनचे राष्ट्राध्यक्ष जोसेफ औन यांच्या कार्यालयाने इंस्टाग्रामवर पोस्ट केले की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि लेबनॉनचे राष्ट्राध्यक्ष जोसेफ औन यांनी आज दुपारी फोनवर संवाद साधला आहे. या चर्चेच्या दरम्यान, राष्ट्राध्यक्ष जोसेफ औन यांनी लेबनॉनमध्ये युद्धविराम घडवण्यासाठी आणि चिरस्थायी शांतता प्रस्थापित होण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे पुन्हा एकदा आभार मानले. ट्रम्प यांच्या प्रयत्नांमुळे या प्रदेशातील शांतता प्रक्रियेचा मार्ग मोकळा झाला आहे. हे प्रयत्न असेच सुरू राहतील जेणेकरून संघर्ष लवकरात लवकर थांबवता येईल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे. ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्ष जोसेफ औन आणि लेबनॉनला आपला पाठिंबा पुन्हा व्यक्त केला आणि लेबनॉनची मागणी लवकरात लवकर पूर्ण होईल अशी आशाही व्यक्त केली आहे.

इस्रायली हल्ल्यांमुळे लेबनॉनमध्ये २,१९६ ठार

दरम्यान, लेबनॉनमधील हिजबुल्लाच्या ठिकाणांवर इस्रायलने केलेल्या बॉम्बहल्ल्यांमुळे लेबनॉनमध्ये मोठ्या प्रमाणात जीवित आणि मालमत्तेची हानी झाली आहे. लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी दिलेल्या माहितीनुसार, इस्रायली हल्ल्यांमध्ये ठार झालेल्या लेबनॉनच्या नागरिकांची एकूण संख्या २,१९६ झाली आहे.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0