जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धेत भद्रावतीच्या 'बालकुमार स्केटिंग अकादमी'चा डंका;
जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धेत भद्रावतीच्या 'बालकुमार स्केटिंग अकादमी'चा डंका; मुख्य प्रशिक्षक राज येरणे यांच्या मार्गदर्शनात ८ खेळाडूंना सुवर्णपदक!
भद्रावती: ( सुनील दैदावार )
चंद्रपूर येथे नुकत्याच संपन्न झालेल्या ५ व्या जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धेत भद्रावती येथील 'बालकुमार स्केटिंग अकादमी'च्या विद्यार्थ्यांनी आपल्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत घवघवीत यश संपादन केले आहे. अकादमीचे मुख्य प्रशिक्षक राज येरणे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली खेळताना विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत विविध वयोगटात एकूण ८ सुवर्ण, ६ रौप्य, १ कांस्य आणि २ चतुर्थ क्रमांक पटकावून भद्रावती शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
या स्पर्धेत अकादमीच्या खेळाडूंनी कमालीची चिकाटी आणि कौशल्य दाखवले. विजेत्या विद्यार्थ्यांची कामगिरी खालीलप्रमाणे आहे:
प्रथम क्रमांक (सुवर्णपदक) अन्विका उके, दिग्वी पाल, नमन दानव, गार्गवी वाघाडे, स्वरा कावडे, प्रज्योत कटलावार, आस्था मत्ते आणि विहान थेरे. द्वितीय क्रमांक (रौप्यपदक) स्वरूप काहुरके, आदर्श व्ही. मेश्राम, योग मानकर, सार्थक उमरे, प्रतीक हजारे आणि ओमवेद किटे.
तृतीय क्रमांक (कांस्यपदक): शिवोम आत्राम. चतुर्थ क्रमांक अभिनव देशमुख आणि यश आखाडे.
विद्यार्थ्यांच्या या दैदिप्यमान यशाबद्दल बालकुमार स्केटिंग अकादमीचे मुख्य प्रशिक्षक राज येरणे, अकादमीचे सर्व पदाधिकारी, पालक वर्ग आणि भद्रावती शहरातील क्रीडाप्रेमींनी विजेत्या खेळाडूंचे भरभरून कौतुक केले असून त्यांच्या पुढील वाटचालीस व आगामी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0