राज्यस्तरीय पोलीस क्रीडा स्पर्धेत अमरावती ग्रामीण पोलिसांचा झेंडा उंच

May 7, 2026 - 13:46
 0  1
राज्यस्तरीय पोलीस क्रीडा स्पर्धेत अमरावती ग्रामीण पोलिसांचा झेंडा उंच

राज्यस्तरीय पोलीस क्रीडा स्पर्धेत अमरावती ग्रामीण पोलिसांचा झेंडा उंच
अमरावती : मुंबई येथे पार पडलेल्या ३६ व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेत Amravati Rural Police च्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत जिल्ह्याचे नाव राज्यभर उज्ज्वल केले. दि. २० एप्रिल ते २७ एप्रिल २०२६ या कालावधीत झालेल्या स्पर्धेत राज्यातील विविध पोलीस दलातील खेळाडूंनी सहभाग घेतला होता.
अमरावती ग्रामीण पोलीस दलाच्या खेळाडूंनी तायक्वांदो, वुशू, व्हॉलीबॉल, तिहेरी उडी आणि रिले स्पर्धांमध्ये उत्कृष्ट प्रदर्शन करत सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदकांची कमाई केली.
स्पर्धेत म.पो.कॉ. वैष्णवी उचितकर यांनी तायक्वांदोमध्ये सुवर्ण तर वुशूमध्ये कांस्य पदक पटकावत दुहेरी यश मिळवले. पो.कॉ. चिराग तायडे यांनी वुशूमध्ये रौप्य, पो.कॉ. आकाश इंदुरकर यांनी तिहेरी उडीत रौप्य, तसेच म.पो.कॉ. वैशाली शिंगाडे आणि म.पो.कॉ. करूणा काळे यांनी व्हॉलीबॉलमध्ये रौप्य पदक मिळवले. पो.कॉ. अक्षय नितनवरे यांनी तायक्वांदोमध्ये कांस्य, तर म.पो.कॉ. मनीषा पवार यांनी ४x४०० रिलेमध्ये कांस्य पदक पटकावले.
याशिवाय पुणे येथे झालेल्या २६ व्या महाराष्ट्र राज्य पोलीस शूटिंग स्पर्धेत पो.हे.कॉ. निलेश अंबर्ते यांनी नेत्रदीपक कामगिरी करत एक सुवर्ण, एक रौप्य आणि एक कांस्य पदक जिंकले. एमपी-५ फायरिंग प्रकारात त्यांनी “बेस्ट शुटर” किताबही मिळवून विशेष गौरव प्राप्त केला.
या सर्व खेळाडूंचा गौरव दि. ६ मे रोजी जोग स्टेडियम, अमरावती येथे आयोजित विशेष कार्यक्रमात करण्यात आला. Niketan Kadam यांच्या हस्ते खेळाडूंना प्रशस्तीपत्र आणि पदक देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी अपर पोलीस अधीक्षक डी. एल. तोटेवाड आणि सागर भामरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0