लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; २५ जुलैपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन
लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; २५ जुलैपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन
अमरावती | प्रतिनिधी : महाराणा प्रतापसिंह सार्वजनिक सेवा समिती, अमरावतीतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे.
यासाठी १० वी व १२ वीमध्ये ८० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळविणारे विद्यार्थी, तसेच क्रीडा, साहित्य, कला क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे आणि वैद्यकीय, अभियांत्रिकी, कृषी व इतर पदवी अभ्यासक्रमांमध्ये प्रथम श्रेणी किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळविणारे विद्यार्थ्यांनी २५ जुलै २०२६ पर्यंत आपली कागदपत्रे ठाकूर फटाका भंडार, गांधी चौक, अमरावती येथे जमा करावीत.
सत्कार समारंभ १ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ५ ते ९ या वेळेत जोशी हॉल, श्याम चौक, अमरावती येथे आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र, स्मृतिचिन्ह आणि रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार असून लोकमान्य टिळक यांच्या जीवनकार्यावर व्याख्यान तसेच भोजनाचीही व्यवस्था करण्यात आली आहे.
समितीचे अध्यक्ष डॉ. जितेंद्रसिंह राजकुमार आणि सचिव प्रा. राकेशसिंह ठाकूर यांनी अमरावती शहर, बडनेरा आणि नांदगावपेठ परिसरातील पात्र विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0