संकष्टी चतुर्थी 2025: चंद्रोदयाची वेळ, पूजा विधी आणि विशेष माहिती
संकष्टी चतुर्थी 2025 तारीख तारीख: बुधवार, १० सप्टेंबर २०२५ तिथी सुरू होईल: दुपारी ३:३७ (१० सप्टेंबर) तिथी समाप्त होईल: दुपारी १२:४५ (११ सप्टेंबर) गणेशोत्सव नुकताच संपला असून भक्त अजूनही बाप्पाच्या आठवणीत भावूक झाले आहेत. अशा वेळी आलेली संकष्टी चतुर्थी ही भक्तांसाठी खास पर्वणी आहे.
आज चंद्रोदयाची वेळ
संकष्टी चतुर्थीच्या दिवशी चंद्रदर्शन विशेष महत्त्वाचे असते.
-
आज चंद्रोदय: रात्री ८:०६ वाजता
या वेळी आरती करून उपवास सोडला जातो.
संकष्टी चतुर्थी पूजा विधी
-
सकाळी लवकर उठून स्नान करावे.
-
सूर्यदेवाला जल अर्पण करावा.
-
पूजास्थान गंगाजलाने शुद्ध करून लाल वस्त्र पसरावे.
-
गणेशाची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापित करावी.
-
हातात पाणी व तांदूळ घेऊन उपवासाचे संकल्प करावे.
-
गणेशाला अभिषेक करावा व तूपाचा दिवा, धूप लावावा.
-
लाल फुले (जास्वंद), दुर्वा आणि अक्षता अर्पण करावी.
-
गणेश मंत्र जप करावा –
-
"ॐ गणपतये नमः"
-
"ॐ विघ्नराजाय नमः"
-
-
संकष्टी चतुर्थीची कथा ऐकावी.
-
संध्याकाळी चंद्रोदयानंतर गणेशाची आरती करून उपवास सोडावा.
धार्मिक महत्त्व
-
या दिवशी विघ्नराज गणेश या रूपाची पूजा केल्याने अडथळे दूर होतात.
-
कामात यश, मनःशांती आणि सुख-समृद्धी लाभते.
-
उपवास करणाऱ्यांना विशेष पुण्यफळ मिळते अशी श्रद्धा आहे.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0