चाणक्य नीती: या तीन लोकांकडे कधीच पैसे टिकत नाहीत, जाणून घ्या कारण
नवी दिल्ली: चाणक्य हे महान विचारवंत, राजनयिक आणि अर्थशास्त्रज्ञ होते. त्यांनी लिहिलेल्या ‘चाणक्य नीती’ या ग्रंथात जीवन, अर्थव्यवस्था आणि यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टींचा सखोल उलगडा केला आहे. त्यांच्या शिकवणी आजही आधुनिक काळात मार्गदर्शक ठरतात. चाणक्यांनी त्यांच्या नीतित काही लोकांविषयी सांगितले आहे की कितीही पैसे कमवले तरी पैसा त्यांच्या हातात टिकत नाही. यामागे देवी लक्ष्मीचा आशिर्वाद न मिळणे आणि चुकीच्या सवयी कारणीभूत ठरतात.
जे लोक कठोर आणि स्पष्ट बोलतात
-
चाणक्य म्हणतात, अति कठोर आणि थेट बोलणारे लोक अनेकदा इतरांच्या मनाला लागतात.
-
अशा लोकांकडे पैसा जास्त काळ टिकत नाही.
-
उलट, गोड बोलणारे आणि इतरांना जिंकणारे लोक नेहमी समृद्धीचा अनुभव घेतात.
जे लोक गरजेपेक्षा जास्त खातात
-
अत्यधिक खाणे ही वाईट सवय आहे.
-
गरजेपेक्षा जास्त खाणारे लोक आपल्या आरोग्यासोबतच पैशांचीही नासाडी करतात.
-
त्यामुळे अशा लोकांकडे पैसा कधीच टिकून राहत नाही.
जे लोक अस्वच्छ असतात
-
चाणक्यांच्या मते, देवी लक्ष्मीला स्वच्छता प्रिय आहे.
-
ज्या घरात अस्वच्छता असते, तिथे संपत्ती जास्त काळ टिकत नाही.
-
स्वच्छ आणि नीटनेटके घर हे समृद्धीचं लक्षण मानलं जातं.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0