Bigg Boss Marathi 6 Finale : ‘बिग बॉस मराठी 6’च्या विजेत्याला काय काय मिळणार? रितेश देशमुखकडून खुलासा

Apr 19, 2026 - 22:28
 0  2
Bigg Boss Marathi 6 Finale : ‘बिग बॉस मराठी 6’च्या विजेत्याला काय काय मिळणार? रितेश देशमुखकडून खुलासा

Bigg Boss Marathi 6 Finale : 'बिग बॉस मराठी 6'च्या विजेत्याला ट्रॉफीसोबतच बऱ्याच गोष्टी मिळणार आहेत. ग्रँड फिनालेच्या एपिसोडमध्ये रितेशने याविषयीचा खुलासा केला आहे. विजेत्याला काय काय मिळणार, ते जाणून घ्या..

'बिग बॉस मराठी'च्या सहाव्या सिझनचा ग्रँड फिनाले पार पडत असून लवकरच विजेता घोषित होणार आहे. या फिनालेच्या एपिसोडचं सूत्रसंचालन रितेश देशमुख करत असून सुरुवातीला त्याने बक्षिसांची घोषणा केली. बिग बॉसच्या विजेत्याला काय काय मिळणार, याबद्दलचा खुलासा रितेशने केला आहे.

यंदाच्या सिझनच्या विजेत्याला बिग बॉसची सुरेख ट्रॉफी तर मिळणारच आहे. पण त्याचसोबत 15 लाख रुपयांचा चेक, ई-स्कूटी, पु. ना. गाडगीळ यांच्याकडून 10 लाख रुपयांचं गिफ्ट वाऊचरसुद्धा मिळणार आहे. त्यामुळे विजेत्यावर बक्षिसांचा वर्षाव होणार आहे.

'बिग बॉस मराठी 6'च्या ग्रँड फिनालेमध्ये राकेश बापट, अनुश्री माने, दिपाली सय्यद, विशाल कोटियन आणि तन्वी कोलते यांच्यात चुरस रंगली आहे. या पाच जणांपैकी कोण विजेता ठरणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

जानेवारी 2026 मध्ये या सहाव्या सिझनची सुरुवात झाली होती. आता तीन महिन्यांनंतर या सिझनच्या विजेत्याची घोषणा होणार आहे. 17 स्पर्धकांनी या सिझनमध्ये सहभाग घेतला होता. ग्रँड फिनालेच्या एपिसोडमध्ये अभिषेक बच्चनने प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लावली.

यंदाच्या सिझनच्या विजेत्याला मिळणारी बक्षिसाची रक्कम इतर सिझन्सपेक्षा कमी असली तरी इतर बऱ्याच गोष्टी विजेत्याला मिळणार आहेत. त्याचसोबत टॉप 5 स्पर्धकांना दुबईची सफरसुद्धा करायला मिळणार आहे.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0