गाडगेनगर, नवसारी कचरा स्पॉट व स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सची आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांची पाहणी; नियोजनबद्ध कामाचे निर्देश

Jul 17, 2026 - 12:09
 0  0
गाडगेनगर, नवसारी कचरा स्पॉट व स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सची आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांची पाहणी; नियोजनबद्ध कामाचे निर्देश

गाडगेनगर, नवसारी कचरा स्पॉट व स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सची आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांची पाहणी; नियोजनबद्ध कामाचे निर्देश

अमरावती | प्रतिनिधी : अमरावती महानगरपालिका आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांनी गुरुवारी गाडगेनगर परिसर, नवसारी कचरा स्पॉट आणि नवसारी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सची पाहणी करून स्वच्छता, कचरा व्यवस्थापन आणि विकासकामांचा आढावा घेतला. सर्व विभागांनी परस्पर समन्वय राखत नियोजनबद्ध पद्धतीने कामे पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

पाहणीची सुरुवात संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी स्थानिक नगरसेवकांनी परिसरातील स्वच्छता, पायाभूत सुविधा व विकासकामांशी संबंधित विविध समस्या आयुक्तांसमोर मांडल्या. त्यावर संबंधित विभागांनी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले.

नवसारी कचरा स्पॉटवर आयुक्तांनी कचरा संकलन, विल्हेवाट व व्यवस्थापनाची पाहणी करत नियमित देखरेख ठेवण्याच्या सूचना दिल्या. शहरात कुठेही कचरा साचणार नाही, यासाठी प्रभावी व शिस्तबद्ध व्यवस्थापन करण्यावर त्यांनी भर दिला.

यानंतर नवसारी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समधील सुरू असलेल्या कामांची पाहणी करून प्रलंबित कामे दर्जेदार पद्धतीने आणि निश्चित कालमर्यादेत पूर्ण करण्याचे आदेश दिले. शहरातील स्वच्छता, कचरा व्यवस्थापन आणि सार्वजनिक सुविधांबाबत कोणताही हलगर्जीपणा सहन केला जाणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला.

यावेळी अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, उपायुक्त भाग्यश्री बोरेकर, सहाय्यक आयुक्त नंदकिशोर तिखिले यांच्यासह मनपाचे अधिकारी, नगरसेवक आणि कर्मचारी उपस्थित होते.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0