बल्लारपूर येथे जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धेत भद्रावतीच्या 'बालकुमार स्केटिंग अकादमी'चा डंका!*
*बल्लारपूर येथे जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धेत भद्रावतीच्या 'बालकुमार स्केटिंग अकादमी'चा डंका!*
*प्रशिक्षक राज येरणे यांच्या मार्गदर्शनात २८ पदकांची ऐतिहासिक कमाई*
**भद्रावती:
बल्लारपूर येथे नुकत्याच संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय रोलर स्केटिंग चॅम्पियनशिपमध्ये भद्रावतीच्या ‘बालकुमार स्केटिंग अकादमी’च्या विद्यार्थ्यांनी आपल्या उत्कृष्ट कौशल्याचे प्रदर्शन करत घवघवीत यश संपादन केले. या स्पर्धेत अकादमीच्या एकूण ४८ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता, त्यापैकी तब्बल २८ विद्यार्थ्यांनी पदकांवर आपले नाव कोरले. यामध्ये १० सुवर्ण, ११ रौप्य आणि ७ कांस्य पदकांचा समावेश आहे. प्रशिक्षक राज येरणे यांचे उत्कृष्ट मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांनी घेतलेली कठोर मेहनत यामुळेच हे यश मिळाल्याचे बोलले जात आहे.
*पदक विजेते खेळाडू खालीलप्रमाणे:*
* *सुवर्ण पदक विजेते (१०):* वर्णिका आर. कुचेकर, युवान विशाल गौरकर, गार्गवी एम. वाघाडे, नमन जे. दानव (सर्व Beginner गट), सानिध्य एन. ठाकरे, रिद्धी रोहित गुंडावार, स्वरा आर. कवाडे, अश्विनी एस. नागपुरे (सर्व Quad गट), यश रवींद्र आखाडे (Recreational) आणि आस्था अनंत मत्ते (Inline गट).
* *रौप्य पदक विजेते (११):* गाथा पी. पिंपळकर, लिहांश शेळकी, हृदयांश आर. मस्के, जय सचिन इंगोले (सर्व Beginner गट), हिराई अमर शिवरकर, अगत्स्य एन. ठाकरे, खुशी नरेश भुसारी, देवांशु दत्ता सैताने, झुवेरिया एस. अली (सर्व Quad गट), आरोह सीमा वानखेडे आणि इक़रा नाज़ शकील हनफी (Recreational गट).
* *कांस्य पदक विजेते (७):* अर्पित आर. पिंपळकर, अद्विक उमेश बिपटे, स्वरुप एस. कहुरके, सारंग गणेश टोंगे (सर्व Beginner गट), रिद्धी संतोष इटणकर, कार्तिक पी. चिलबुले (Quad गट) आणि आरोही रोहित गुंडावार (Recreational गट).
या स्पर्धेत अकादमीकडून Beginner गटात १९, Quad गटात २४, Recreational गटात ४ आणि Inline गटात १ विद्यार्थ्याने सहभाग नोंदवला होता. सर्वच खेळाडूंनी मैदानावर जिद्दीने खेळ केला.
*पालकांचा विश्वास आणि विद्यार्थ्यांची मेहनत यशाचे मूळ - प्रशिक्षक राज येरणे*
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल बोलताना मुख्य प्रशिक्षक राज येरणे म्हणाले की, "वेळेचे पालन, शिस्त आणि सातत्यपूर्ण मेहनत हीच या यशाची गुरुकिल्ली आहे. रिंगणात पडल्यानंतरही पुन्हा जिद्दीने उभे राहून धावण्याची जी चिकाटी विद्यार्थ्यांनी दाखवली, ती अभिमानास्पद आहे. हे यश केवळ विद्यार्थ्यांचे नसून, पालकांनी अकादमीवर दाखवलेला विश्वास आणि मुलांनी घेतलेल्या कष्टाचे हे फळ आहे."
बालकुमार अकादमीच्या या घवघवीत यशाबद्दल सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे, त्यांच्या पालकांचे, विविध शाळांचे प्रशासन आणि भद्रावती शहरातील क्रीडाप्रेमींकडून जोरदार कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0