एसजीबीएयूचा ४३ वा स्थापना दिन साधेपणात साजरा; तंत्रज्ञानाधारित शिक्षणावर भर

SGBAU Celebrates 43rd Foundation Day | Focus on Tech-Based Education

May 3, 2026 - 17:48
May 3, 2026 - 17:48
 0  1
एसजीबीएयूचा ४३ वा स्थापना दिन साधेपणात साजरा; तंत्रज्ञानाधारित शिक्षणावर भर

एसजीबीएयूचा ४३ वा स्थापना दिन साधेपणात साजरा; तंत्रज्ञानाधारित शिक्षणावर भर
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ मध्ये १ मे रोजी स्थापना दिन, महाराष्ट्र दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिन निमित्त ध्वजारोहण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी ध्वजारोहण केले.
यावेळी बोलताना त्यांनी विद्यापीठाला तंत्रज्ञान व कौशल्याधारित शिक्षणाच्या माध्यमातून नव्या उंचीवर नेण्याचा निर्धार व्यक्त केला. एआय व मशीन लर्निंगसाठी स्वतंत्र उत्कृष्टता केंद्र, उच्चगती इंटरनेट सुविधा आणि आधुनिक अभ्यासक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उद्योगसिद्ध बनविण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
विद्यापीठाने ‘स्टार्टअप इंडिया’ उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत स्टार्टअप्सना आर्थिक मदत दिली आहे. क्रीडा क्षेत्रातही विद्यापीठाने राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करत आपली छाप पाडली आहे.
तसेच ‘पीएम-उषा’ योजनेंतर्गत पायाभूत सुविधा मजबूत करण्यासोबतच चिखलदरा येथे आदिवासी विद्यार्थ्यांसाठी कौशल्य विकास केंद्र उभारले जात आहे.
कार्यक्रमाला विद्यापीठातील विविध विभागांचे अधिकारी, शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. संचालन डॉ. तनुजा राऊत यांनी केले.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0