IPL 2026, RCB vs GT : आरसीबी आणि गुजरात टायटन्स यांच्यात लढत, इतिहासात कोण सरस? जाणून घ्या

Apr 23, 2026 - 20:55
 0  0
IPL 2026, RCB vs GT : आरसीबी आणि गुजरात टायटन्स यांच्यात लढत, इतिहासात कोण सरस? जाणून घ्या

आयपीएल 2026 स्पर्धेतील 34व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स हे संघ आमनेसामने येणार आहेत. या सामन्यात कोणाचं पारडं जड ते जाणून घेऊयात.

आयपीएल 2026 स्पर्धा आता पुढे सरकत असताना प्रत्येक सामन्याला महत्त्व प्राप्त झालं आहे. कारण प्रत्येक जय पराजयानंतर गुणतालिकेत उलथापालथ होताना दिसत आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स या स्पर्धेतील आपला सातवा सामना खेळणार आहेत. यापूर्वी दोन्ही संघांनी सहा सामने खेळले असून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 4 सामन्यात विजय मिळवला आहे. आरसीबीचे 8 गुण असून +1.171 नेट रनरेट आहे. यासह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. तर गुजरात टायटन्सने 6 पैकी 3 सामने जिंकले असून 6 गुण आणि -0.821 नेट रनरेट आहे. यासह गुजरात टायटन्स संघ सहाव्या स्थानावर आहे. आता दोन्ही संघ भिडणार असून गुणतालिकेत उलथापालथ करण्याची संधी आहे. आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात दोन्ही संघांनी आतापर्यंत सहा सामने खेळले आहेत. या सहा सामन्यात कशी कामगिरी आहे ते जाणून घेऊयात..

दोन्ही संघांची हेड टू हेड कामगिरी

रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु आणि गुजरात टायटन्स यांच्यात आतापर्यंत सहा लढती झाल्या आहेत. दोन्ही संघांचं बळ समान असल्याचं दिसून येत आहे. कारण सहा सामन्यांपोकी दोन्ही संघांनी प्रत्येकी तीन विजय मिळवले आहेत. त्यामुळे या दोन्ही संघात बरोबरीची स्पर्धा आहे. आयपीएल 2025 स्पर्धेत दोन्ही एकदाच आमनेसामने आले होते. तेव्हा गुजरात टायटन्सने हा सामना 8 विकेट राखून जिंकला होता. आयपीएल 2024 स्पर्धेत दोन्ही सामने आरसीबीने जिंकले होते. तर 2023 मध्ये गुजरात टायटन्सच्या पारड्यात विजय पडला होता. 2022 मध्ये एक सामना गुजरात टायटन्स आणि एक सामना आरसीबीने जिंकला होता.

गुजरात टायटन्सला त्यांच्या शेवटच्या सामन्यात मुंबई इंडियन्सकडून 99 धावांनी पराभव पत्करावा लागला होता. तर आरसीबीने या हंगामातील आपला मागचा सामना घरच्या मैदानावर दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध खेळला आणि त्यात 6 गडी राखून पराभव पत्करावा लागला. त्यामुळे हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा असेल. दोन्ही संघांमधील सामन्यांमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुने सर्वाधिक धावसंख्या नोंदवली आहे. आरसीबीने गुजरात टायटन्सविरुद्ध एका सामन्यात 206 धावा केल्या होत्या. तर गुजरात टायटन्सनेची आरसीबीविरुद्ध सर्वोत्तम धावसंख्या 200 आहे.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0