इतवारा बाजारात प्लास्टिक जप्‍ती व डस्‍टबिन तपासणी विशेष मोहीम

May 19, 2026 - 16:20
 0  0
इतवारा बाजारात प्लास्टिक जप्‍ती व डस्‍टबिन तपासणी विशेष मोहीम

इतवारा बाजारात प्लास्टिक जप्‍ती व डस्‍टबिन तपासणी विशेष मोहीम
२२ आस्थापनांची तपासणी; १२ हजार रुपयांचा दंड वसूल
अमरावती प्रतिनिधी : 
अमरावती महानगरपालिका उत्तर झोन क्र.१ रामपुरी कॅम्प अंतर्गत प्लास्टिकमुक्त परिसर अभियानाला गती देण्यासाठी दिनांक १८ मे २०२६ रोजी इतवारा बाजार परिसरात प्लास्टिक जप्ती व डस्टबिन तपासणी विशेष मोहीम राबविण्यात आली. महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा व अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली.
वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता) डॉ. अजय जाधव तसेच सहाय्यक आयुक्त नंदकिशोर तिखिले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या मोहिमेत एकूण २२ आस्थापनांची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर आढळून आल्याने पवन किराणा या आस्थापनावर ५ हजार रुपयांचा दंड आकारण्‍यात आला.
तसेच डस्टबिन नसल्याबाबत व्यंकटेश तेल भंडार, प्रविण साहू, जय बजरंग स्वीट मार्ट, राजु नमकीन, शिवाणी स्वीट मार्ट, पटेरिया स्वीट मार्ट आणि हेमराज साहू या आस्थापनांवर प्रत्येकी १ हजार रुपयांप्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात आली. या मोहिमेत एकूण १२ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
या विशेष मोहिमेत प्लास्टिक नोडल अधिकारी ए. के. गोहर, ज्येष्ठ स्वास्थ निरीक्षक राजू डीक्याव, प्लास्टिक स्वास्थ निरीक्षक सचिन सैनी, स्वास्थ निरीक्षक मेघराज ढेनवाल, निखिल खंगाळे, एम. सैय्यद, शाहू जवंजाळ, अनिकेत महल्ले आणि आशिष सहारे यांनी सहभाग घेतला.
“स्वच्छ शहर – सुंदर शहर” या संकल्पनेला बळकटी देण्यासाठी नागरिकांनी प्लास्टिकमुक्त परिसर निर्मितीस सहकार्य करावे, असे आवाहन अमरावती महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0