५६ वी जीएसटी कौन्सिल बैठक: शेतकरी, विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांसाठी दिवाळीपूर्वी मोठी भेट
५६ व्या जीएसटी कौन्सिल बैठकीत केंद्र सरकारने आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या सुधारणा जाहीर केल्या आहेत. दोन दिवसांच्या बैठकीच्या पहिल्या दिवशीच अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असून, १२% आणि २८% कर स्लॅब रद्द करून फक्त ५% आणि १८% स्लॅब ठेवले गेले आहेत. सरकारने याला “नेक्स्ट जनरेशन जीएसटी रिफॉर्म” असे नाव दिले आहे. हे बदल २२ सप्टेंबरपासून देशभरात लागू होणार असून, याचा थेट फायदा शेतकरी, विद्यार्थी, मध्यमवर्गीय आणि कर्मचाऱ्यांना होणार आहे.
दैनंदिन वस्तू आता स्वस्त
-
केसांचे तेल, शाम्पू, टूथपेस्ट, टॉयलेट साबण, शेव्हिंग क्रीम यावर १८% ऐवजी ५% जीएसटी.
-
बटर, तूप, चीज, पॅकेज्ड स्नॅक्स, डेअरी स्प्रेडवरील कर १२% वरून ५%.
-
फीडिंग बॉटल, क्लिनिकल डायपर, शिवणयंत्र आता कमी दरात उपलब्ध.
आरोग्य क्षेत्रात दिलासा
-
आरोग्य आणि जीवन विम्यावरील १८% जीएसटी पूर्णपणे रद्द.
-
ऑक्सिजन, डायग्नोस्टिक किट, ग्लुकोमीटर, करेक्टिव्ह ग्लासेस, थर्मामीटरवर फक्त ५% जीएसटी.
विद्यार्थ्यांसाठी मोठा फायदा
-
नकाशे, चार्ट, नोटबुक, पेन्सिल, शार्पनर, क्रेयॉन्स, इरेजर यावर ०% कर.
-
शालेय साहित्य करमुक्त झाल्यामुळे पालकांचा शैक्षणिक खर्च कमी होणार.
शेतकऱ्यांना मोठी भेट
-
ट्रॅक्टर व सुटे भागांवरील जीएसटी १८% वरून ५%.
-
जैविक कीटकनाशके, ठिबक सिंचन यंत्रणा आणि आधुनिक कृषी यंत्रसामग्री ५% स्लॅबमध्ये.
वाहन खरेदी स्वस्त
-
काही पेट्रोल, डिझेल, CNG वाहने आता १८% स्लॅबमध्ये.
-
३५० सीसीपर्यंत मोटारसायकली, तीन चाकी वाहने व व्यावसायिक वाहने स्वस्त होणार.
इलेक्ट्रॉनिक्स आणि गृहउपयोगी वस्तूंवर दिलासा
-
एसी, ३२ इंचापेक्षा मोठे टीव्ही, मॉनिटर, प्रोजेक्टर, डिशवॉशरवरील जीएसटी २८% वरून १८%.
-
त्यामुळे घरगुती बजेटवरील भार कमी होणार.
लघु व मध्यम व्यवसायांसाठी सुलभता
-
स्वयंचलित जीएसटी नोंदणी फक्त ३ दिवसांत.
-
कर परतफेड आणि इनपुट क्रेडिट प्रक्रिया वेगवान.
-
MSME व छोट्या उद्योजकांना थेट फायदा.
पंतप्रधानांची प्रतिक्रिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, “जीएसटी दर कपात आणि प्रक्रिया सुधारणांचा थेट फायदा शेतकरी, महिला, तरुण, मध्यमवर्ग आणि MSME क्षेत्राला होईल. यामुळे राहणीमान स्वस्त आणि व्यवसाय सोपा होईल.”
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0