जनगणना २०२७ च्या कामात राजापेठ व दस्तूरनगर झोन अव्वल; आयुक्तांकडून गौरव

Jun 11, 2026 - 13:14
 0  0
जनगणना २०२७ च्या कामात राजापेठ व दस्तूरनगर झोन अव्वल; आयुक्तांकडून गौरव

जनगणना २०२७ च्या कामात राजापेठ व दस्तूरनगर झोन अव्वल; आयुक्तांकडून गौरव

अमरावती, दि. १० जून : जनगणना २०२७ च्या पूर्वतयारी अंतर्गत घरयादी आणि गटयादी तयार करण्याच्या कामात अमरावती महानगरपालिकेच्या राजापेठ आणि दस्तूरनगर झोनने उल्लेखनीय कामगिरी करत मुदतीपूर्वीच १०० टक्के काम पूर्ण केले आहे.

या यशस्वी कामगिरीबद्दल मनपा आयुक्त तथा प्रधान जनगणना अधिकारी ** यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचा प्रशस्तीपत्र देऊन सत्कार केला.

जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्यात शहरातील घरे, इमारती, व्यावसायिक आस्थापना आणि इतर वास्तूंची डिजिटल नोंदणी केली जात आहे. राजापेठ व दस्तूरनगर झोनने ७ जूनलाच हे काम पूर्ण करून शहरात प्रथम क्रमांक पटकावला.

यावेळी आयुक्त वर्षा लड्डा यांनी जनगणना ही शहराच्या भविष्यातील विकास नियोजनासाठी अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया असल्याचे सांगत उर्वरित कार्यालयांनीही वेळेत काम पूर्ण करण्याचे आवाहन केले.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0