आईची हत्या केली, पोटच्या मुलानेच घेतला जीव; पोलिसही हादरले....
आई-मुलाच्या नात्याचाच गळा घोटल्याच्या दोन घटना नाशिक शहरात घडल्या. या घटनांनी नाशिक शहरात खळबळ उडाली. या दोन्ही घटनांमध्ये ज्यांना जन्म दिला त्याच मुलांनी आपल्या सख्ख्या आईचा खून केला आहे. नाशिकरोड भागात मनोरुग्ण ५७ वर्षीय व्यक्तीने अंथरुणाला खिळलेल्या ८५ वर्षीय मातेचा गळा आवळून निघृणपणे खून केला. मला कंटाळा आला होता म्हणून आईची हत्या केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. हे ऐकून पोलिसही हादरले.
नाशिकरोड येथील जेलरोड भगवा चौकाजवळ असलेल्या अष्टविनायकनगर येथे राहणाऱ्या यशोदाबाई मुरलीधर पाटील (८५) मंगळवारी रात्री घरी झोपलेल्या होत्या. आजारी असल्यामुळे त्या तशाही अंथरुणाला खिळून होत्या.
आरोपीची बायको सोडून गेली
त्यांच्यासोबत त्यांचा मनोरुग्ण मुलगा अरविंद उर्फ बाळू मुरलीधर पाटील (५७) हा राहत होता. तो विवाहित आहे, मात्र मानसिक आजारामुळे बायको त्याला सोडून गेलेली आहे. यामुळे घरात आई व मुलगा हे दोघेच राहत होते.
आधी आईची हत्या, नंतर पोलीस ठाण्यात जाऊन कबुली
अरविंद याने त्याच्या हाताने आपली आई यशोदाबाई यांचा गळा आवळून रात्री हत्या केली. यानंतर तो स्वतः नाशिक रोड पोलीस ठाण्यात गेला. आईची गळा आवळू हत्या केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. ते पोलीस अवाक् झाले.
पोलिसांना खरे वाटले नाही, पण...
बाळूचे बोलणे ऐकून पोलिसांनीही सुरुवातीला त्यावर विश्वास ठेवला नाही. नाशिकरोड पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने त्याला पोलिस वाहनात बसवून घटनास्थळ गाठले. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सचिन बारी, पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे हे घटनास्थळी दाखल झाले.
त्यांनी घरामध्ये प्रवेश करत पाहणी केली असता पलंगावर यशोदाबाई या निपचित पडलेल्या होत्या. पोलिसांनी लागलीच आजूबाजूच्या रहिवाशांकडे विचारपूस केली व बाळू विरोधात गुन्हा दाखल केला.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0