अखेर भारताचा मित्र मदतीला धावून आला, युद्धभूमीतून सर्वात मोठी गुड न्यूज, तेलसंकट झटक्यात संपणार!

Mar 23, 2026 - 22:56
 0  5
अखेर भारताचा मित्र मदतीला धावून आला, युद्धभूमीतून सर्वात मोठी गुड न्यूज, तेलसंकट झटक्यात संपणार!

इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्ध दिवसेंदिवस भडकत चालले आहे. असे असतानाच भारताला मात्र मोठी गुडन्यूज मिळाली आहे. या गुडन्यूजमुळे भारताचे उर्जासंकट काहीसे संपणार आहे.

Iran Israel War : अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धामुळे भारतापुढे उर्जेचं मोठं संकट निर्माण झालं आहे. इराने होर्मुझची सामुद्रधुनी हा जलमार्ग बंद केल्यामुळे आखाती देशांतून भारताकडे येणारी कच्च्या तेलाची, नैसर्गिक वायून असलेली जहाजे, होर्मुझच्या सामुद्रधुनीतच अडकून पडली आहेत. ही जहाजे भारतात यावीत यासाठी भारताकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत. याच प्रयत्नांमुळे याआधी इराणने भारताच्या दिशेने येणाऱ्या जहाजांना होर्मुझची सामुद्रधुनी खुली केली होती. असे असतानाच आता भारताला आणखी एक मोठी गुड न्यूज मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार होर्मुझच्या सामुद्रधुनीतून एलपीजीने भरलेली दोन जहाजे भारताच्या दिशेने येत आहेत. इराणने या जलप्रवासासाठी परवानगी दिल्याचे सांगितले जात आहे. ही एलपीजीने भरलेली जहाजे भारतात आल्यास सध्या ओढावलेले एलपीजी संकट थोडे कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

नेमकी काय माहिती समोर आली?

मिळालेल्या माहितीनुसार होर्मुझच्या सामुद्रधुनीतून भारतात दोन जहाजे येत आहेत. या जहाजांना भारताच्या दिशेने प्रवास सुरू केला आहे. या जहाजांमध्ये एलपीजी आहे. जग वसंत आणि पाई गॅस अशी या दोन जहाजांची नावे आहेत. ही जहाजे सोमवारी सकाळीच भारताच्या दिशेने निघाली आहेत. या जहाजांना मार्ग द्यावा यासाठी भारत ईराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सशी चर्चा करत होता. आता मंजुरी मिळाल्यानंतर या जहाजांनी आपला प्रवास सुरू केला आहे.

भारतीय नौसेने करून दाखवलं

सूत्रांच्या माहितीनुसार जहाजांना प्रवासाची परवानगी मिळावी यासाठी भारतीय नौसेने विशेष प्रयत्न केले. नौसेने इराणी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर ही जहाजे भारताच्या दिशेने रवाना करण्यास परवानगी मिळाली. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून एलपीजीचा तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे घरगुती गॅस सिलिंडरही महागले आहे. तसेच गॅस बुक केल्यानंतर तो वेळेवर मिळत नाहीये. दुसरीकडे व्यावसायिक गॅस सिलिंडरही मिळणे कठीण झाले आहे. यामुळे अनेक व्यावसाय ठप्प पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सोबतच हॉटेल व्यवसायही अडचणीत सापडला आहे. असे असतानाच आता भारतात एलपीजी घेऊन दोन जहाजे येत असल्याने मोठा दिलासा मिळणार असल्याचे बोलले जात आहे.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0