घुमंतू अतिक्रमणाविरोधात महानगरपालिकेची संयुक्त कारवाई; 1 ट्रक भंगार साहित्य जप्त
घुमंतू अतिक्रमणाविरोधात महानगरपालिकेची संयुक्त कारवाई; 1 ट्रक भंगार साहित्य जप्त
अमरावती, दि. 12 जून 2026 :
अमरावती महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने पोलीस विभागाच्या सहकार्याने आज सकाळी 7.30 ते 11.00 वाजेदरम्यान घुमंतू अतिक्रमणाविरोधात संयुक्त कारवाई राबविली.
या मोहिमेत शहरातील विविध रस्ते व सार्वजनिक ठिकाणांची पाहणी करण्यात आली. पाहणीदरम्यान कोणतेही घुमंतू अतिक्रमण आढळून आले नाही. मात्र, घुमंतूंकडून सार्वजनिक जागेवर जमा करून ठेवण्यात आलेले अंदाजे 1 ट्रक भंगार साहित्य जप्त करण्यात आले.
जप्त करण्यात आलेले साहित्य पुढील कार्यवाहीसाठी महानगरपालिकेच्या कंपोस्ट डेपो येथे जमा करण्यात आले आहे.
शहरातील सार्वजनिक जागा अतिक्रमणमुक्त ठेवण्यासाठी महानगरपालिका सातत्याने कारवाई करत असून, आज सायंकाळी देखील अशीच संयुक्त मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
महानगरपालिकेने नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण अथवा भंगार साहित्य साठवून न ठेवण्याचे आवाहन केले आहे.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0