बकरी ईदपूर्वी अमरावतीत गुन्हे शाखेची कारवाई; कत्तलीसाठी डांबलेले ११ गोवंश मुक्त

May 22, 2026 - 13:30
 0  0
बकरी ईदपूर्वी अमरावतीत गुन्हे शाखेची कारवाई; कत्तलीसाठी डांबलेले ११ गोवंश मुक्त

बकरी ईदपूर्वी अमरावतीत गुन्हे शाखेची कारवाई; कत्तलीसाठी डांबलेले ११ गोवंश मुक्त

अमरावती : बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर अमरावती शहर गुन्हे शाखेने आझाद नगर परिसरात छापा टाकत कत्तलीसाठी ठेवण्यात आलेल्या ११ गोवंश जनावरांची सुटका केली. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध गाडगे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हे शाखेच्या पथकाला गुप्त माहिती मिळाली होती की, आझाद नगर परिसरातील एका टिनशेडमध्ये गोवंश जनावरे बांधून ठेवण्यात आली आहेत. माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाड टाकली.

छाप्यादरम्यान शेडमध्ये लहान-मोठी ११ गोवंश जनावरे अत्यंत कमी जागेत आखूड दोरीने बांधलेल्या अवस्थेत आढळून आली. पोलिसांनी पंचासमक्ष सुमारे २ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेत जनावरांना सुरक्षित स्थळी हलविले.

या प्रकरणी
शेख रियाज शेख इलियास (वय २५, रा. आझाद नगर, अमरावती)
याला अटक करण्यात आली आहे.

गोवंश जनावरांना पुढील संगोपनासाठी दस्तुर नगर येथील गौरक्षण संस्थेत दाखल करण्यात आले असून आरोपीविरुद्ध प्राणी निर्दयता प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे.

ही कारवाई गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0