काळाचं बोलावणं आलं तर जावं लागतं, चारच दिवसांपूर्वी अजितदादा बोलले अन् अपघात, मनाला चटका लावणारी एक्झिट

Jan 28, 2026 - 22:39
 0  0
काळाचं बोलावणं आलं तर जावं लागतं, चारच दिवसांपूर्वी अजितदादा बोलले अन् अपघात, मनाला चटका लावणारी एक्झिट

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातामध्ये निधन झालं आहे, त्यांच्या निधनामुळे संपूर्ण राज्याला मोठा धक्का बसला आहे, दरम्यान आता अजित पवार यांनी चार दिवसांपूर्वी आपल्या भाषणात केलेलं एक विधान समोर आलं आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला आहे. ते मुंबईवरून बारामतीला निघाले होते. बारामतीमध्ये विमान धावपट्टीवर उतरत असताना नियंत्रण सुटून हा अपघात झाला, विमान जमिनीला धडकलं, या अपघातामध्ये अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला आहे. अजित पवार यांच्या निधनामुळे संपूर्ण राज्याला मोठा धक्का बसला आहे. महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. दरम्यान हा अपघात घडण्यापूर्वी चार दिवस आधीच अजित पवार यांनी एक वक्तव्य केलं होतं. काळाचं बोलावणं आलं तर जावं लागतं, तुम्ही -आम्ही आज असू उद्या नसू, काळाचं नितीचं बोलवणं आल्यानंतर प्रत्येकाला जायचं आहे, असं अजित पवार यांनी म्हटलं होतं, आणि त्यानंतर चारच दिवसांमध्ये ही दुर्दैवी घटना घडली आहे. त्यांच्या त्या भाषणाचा व्हिडीओ आता समोर आला आहे.

नेमकं काय म्हणाले होते अजितदादा? 

चारच दिवसांपूर्वी अजित पवार यांनी मोठं विधान केलं होतं. काळाचं बोलावणं आलं तर जावं लागतं, चार दिवसांपूर्वीच अजित पवार यांनी हे वक्तव्य केलं होतं. आणि आज ही मन हेलावणारी घटना घडली आहे. ‘कोण कायमचं राहणार आहे? तुम्ही -आम्ही आज असू उद्या नसू, काळाचं नितीचं बोलवणं आल्यानंतर प्रत्येकाला जायचं आहे. परंतु आपण आपल्या हयातीमध्ये काम करत असताना, राजकारण हेच काही सर्वस्व नाहीये. राजकारण हे होत असतं, निवडणुका संपल्यानंतर राजकारण विसरायचं असतं. पण ज्याच्यामधून त्या भागात आर्थिक सुबत्ता येणार आहे, ते काम त्या ठिकाणी झालं पाहिजे. मित्रांनो हे जग कायमचं राहणार आहे, तुम्ही आम्ही आज,असू उदया नसू, असं त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आज अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला आणि या अपघातामध्ये त्यांचं निधन झालं आहे.

बारामतीमध्ये कार्यकर्त्यांची गर्दी 

अजित पवार यांच्या निधनाचं वृत्त कळताच अजित पवार यांचे कार्यकर्ते प्रचंड अस्वस्थ झाले आहेत. प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी पहायला मिळत आहे. कार्यकर्त्यांनी बारामतीमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे, नेते देखील बारामतीमध्ये दाखल झाले आहेत, नेत्यांना देखील आश्रू अनावर झाले आहेत.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0