बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर परतवाडा-अचलपूरमध्ये संयुक्त शांतता बैठक संपन्न

May 27, 2026 - 12:51
 0  0
बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर परतवाडा-अचलपूरमध्ये संयुक्त शांतता बैठक संपन्न

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर परतवाडा-अचलपूरमध्ये संयुक्त शांतता बैठक संपन्न

अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक मा. निकेतन कदम यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस स्टेशन परतवाडा, अचलपूर व सरमसपुरा हद्दीतील संयुक्त शांतता समिती बैठक मंगळवारी म्युनिसिपल हायस्कूल, परतवाडा येथे पार पडली. आगामी बकरी ईद सण शांततेत व कायद्याचे पालन करून साजरा करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

बैठकीदरम्यान मा. पोलीस अधीक्षकांनी मुस्लिम बांधवांना बकरी ईदच्या शुभेच्छा देत राज्यातील गोहत्या प्रतिबंधक कायद्याचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश दिले. कुर्बानीसाठी पर्यायी जनावरांचा विचार करावा तसेच कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

सोशल मीडियावर कोणतीही पोस्ट, फोटो किंवा व्हिडिओ शेअर करण्यापूर्वी खात्री करूनच प्रसारित करावे, समाजात तेढ निर्माण होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच व्यापाऱ्यांनी आपल्या प्रतिष्ठानाबाहेर सीसीटीव्ही कॅमेरे बसवून पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.

या बैठकीस उपविभागीय पोलीस अधिकारी मनीष ठाकरे, परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी वैष्णवी बाररकर, नगराध्यक्ष रूपाली माधने, पोलीस निरीक्षक सुरेश महस्के, गजानन मेहेत्रे, आधारसिंग सोनोने, निलेश गोपालचावडीकर यांच्यासह सुमारे १०० शांतता समिती सदस्य, पत्रकार व नागरिक उपस्थित होते.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0