गांजा, एमडीनंतर आता ‘चरस’ ; नागपुरी गेट पोलिसांची कारवाई, पेडलर अटकेत

अमरावतीत नागपुरी गेट पोलिसांनी पठाण चौक परिसरात कारवाई करून नागपूरच्या प्रतिक पुनटकरला अटक केली. त्याच्याकडून ९८० ग्रॅम चरस आणि मोबाईलसह ३.५ लाखांचा मुद्देमाल जप्त. एक आरोपी फरार.

Sep 16, 2025 - 11:41
 0  14
गांजा, एमडीनंतर आता ‘चरस’ ; नागपुरी गेट पोलिसांची कारवाई, पेडलर अटकेत

अमरावती : नागपुरी गेट पोलिसांनी अमली पदार्थांविरोधातील सातत्यपूर्ण मोहिमेत आणखी एक मोठी कारवाई केली आहे. पठाण चौक परिसरात झालेल्या या कारवाईत नागपूरचा प्रतिक प्रभाकर पुनटकर (२४, रा. गोंडखोरी, नागपूर) याला अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून तब्बल ९८० ग्रॅम चरस आणि मोबाईल असा एकूण ३ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मात्र, त्याच्यासोबत असलेला दुसरा आरोपी यामिन खान युसुफ खान (रा. कोंढाळी, नागपूर) फरार होण्यात यशस्वी झाला आहे.

पोलिसांची धडक कारवाई

१४ सप्टेंबर रोजी रात्री पठाण चौक भागातील कमानीजवळ दोन संशयित अमली पदार्थ विक्रीसाठी उभे असल्याची गुप्त माहिती नागपुरी गेट पोलिसांना मिळाली. त्यानुसार सहायक पोलिस निरीक्षक वैशाली चव्हाण आणि नव्याने नियुक्त डीबी पथकाने कारवाई केली. पोलिसांना पाहताच एक आरोपी फरार झाला, तर प्रतिक पुनटकर हा स्कूल बॅगसह पोलिसांच्या ताब्यात आला.

मुद्देमाल जप्त

तपासादरम्यान स्कूल बॅगची पाहणी केली असता त्यात २ लाख ८५ हजार रुपये किमतीचे ९८० ग्रॅम चरस आढळले. त्याशिवाय मोबाईल फोनही जप्त करण्यात आला.

पुढील तपास

या प्रकरणी नागपुरी गेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, फरार आरोपीच्या शोधासाठी पोलिसांचे पथक कार्यरत आहे.

#AmravatiNews #NagpuriGatePolice #DrugSeizure #Charas #NagpurCrime #SMRNews

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0