Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना सरकारचं मोठं सरप्राईज; लाभार्थी महिलांना मिळणार थेट 3 हजार रुपये

Mar 15, 2026 - 15:53
 0  6
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना सरकारचं मोठं सरप्राईज; लाभार्थी महिलांना मिळणार थेट 3 हजार रुपये

ज्या कुटुंबांचं आर्थिक उत्पन्न हे कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांसाठी सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्यात येतात. आता या योजनेबाबत मोठी बातमी समोर आली आहे.

ज्या कुटुंबांचं आर्थिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी आहे. अशा कुटुंबातील महिलांसाठी राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेंतर्गत दर महिन्याला लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात दीड हजार रुपये जमा करण्यात येतात. ही योजना महिला वर्गामध्ये चांगलीच लोकप्रिय झाली आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या या लाभात अनियमितता आल्याचं दिसून येत आहे. मागील काही महिन्यांमध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत्या, या निवडणुकांच्या अचारसंहितेमुळे लाडक्या बहिणींना पैसे मिळण्यास विलंब झाल्याचं पहायला मिळालं. दरम्यान आता मोठी बातमी समोर आली आहे.

ती म्हणजे जानेवारी महिन्यानंतर या योजनेतील महिला लाभार्थ्यांना या योजनेचे पैसेच मिळाले नव्हते. मात्र सरकारने आता मोठा निर्णय घेतला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार फेब्रुवारी महिना आणि मार्च महिना अशा दोन महिन्यांचे पैसे लाभार्थी महिलांना एकदाच मिळणार आहेत. नव्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा होणार असल्याची माहिती समोर येत आहे. एप्रिल महिन्यामध्ये लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात तीन हजार रुपये जमा होण्याची शक्यता आहे.

या महिलांचा लाभ बंद होणार 

दरम्यान अशा देखील अनेक महिला होत्या, ज्या या योजनेसाठी पात्र नसताना देखील त्यांनी योजनेचा लाभ घेतला. त्यामुळे सरकारने या योजनेसाठी केवायसी सक्तीची केली. या योजनेसाठी आपली केवायीसी पूर्ण करण्यासाठी सरकारने लाभार्थी महिलांना 31 डिसेंबर 2025 पर्यंतची मुदत दिली होती, त्यानंतर ज्या महिलांनी केवायसी केली आहे, मात्र त्यामध्ये काही तांत्रिक चुका झाल्या आहेत, ती चूक सुधारण्यासाठी आता 31 मार्च पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. या 31 मार्चनंतर ज्या महिलांची केवायसी राहून गेली आहे, किंवा ज्या महिला योजनेसाठी अपात्र ठरल्या आहेत, त्यांचा हाफ्ता बंद होण्याची शक्यता आहे. राज्याच्या आर्थसंकल्पामध्ये या योजनेसाठी भरीव तरदुत करण्यात आली आहे. तसेच ही योजना कधीही बंद होणार नाही, चालूच राहील असंही अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी म्हटलं होतं.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0