अमरावतीतील तलाव दुर्घटनांवर शिवसेनेचा संताप
अमरावतीतील तलाव दुर्घटनांवर शिवसेनेचा संताप
निष्काळजी अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
अमरावती : मार्डी रोडवरील गोडे मेडिकल कॉलेजजवळील तलावात चार निष्पाप नागरिकांचा बुडून मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर शिवसेनेने प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणी संबंधित निष्काळजी अधिकाऱ्यांवर भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 106 अंतर्गत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
शिवसेनेच्या वतीने विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त आणि जलसंपदा विभागाला निवेदन देण्यात आले. दि. 11 मे 2026 रोजी घडलेल्या या दुर्घटनेत कु. सोनाली नरेंद्र जोशी (16), कु. आदित्य नरेंद्र जोशी (12), कु. पायल बबलू पंडित (21) आणि कु. गजानन काकणे (13) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, अमरावती शहर व परिसरात अनेक धोकादायक तलाव आणि अवैध उत्खननामुळे तयार झालेले खड्डे असून त्या ठिकाणी कोणतीही सुरक्षा व्यवस्था नाही. सूचना फलक, संरक्षक कुंपण किंवा राखणदार नसल्यामुळे वारंवार अशा दुर्घटना घडत आहेत.
शिवसेनेने प्रशासनाकडे खालील प्रमुख मागण्या केल्या आहेत :
- सर्व धोकादायक तलावांना ‘प्रवेश निषिद्ध क्षेत्र’ घोषित करावे
- तलाव परिसरात तात्काळ संरक्षक कुंपण व सूचना फलक लावावेत
- संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई करावी
- मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 20 लाख रुपयांची मदत द्यावी
- तलाव परिसरात CCTV कॅमेरे व पोलीस गस्त वाढवावी
- 15 दिवसांत सविस्तर कार्यवाही अहवाल जाहीर करावा
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0