पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा उद्या अमरावती दौरा;

May 8, 2026 - 17:13
 0  1
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा उद्या अमरावती दौरा;

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा उद्या अमरावती दौरा; जिल्हा परिषदेत आढावा बैठक होण्याची शक्यता
चंद्रशेखर बावनकुळे हे शनिवार, दि. ९ मे रोजी अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असून त्यांच्या भेटीकडे प्रशासकीय व राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
दौऱ्यानुसार, पालकमंत्री श्री. बावनकुळे हे दुपारी २ वाजता नागपूर येथून मोटारीने अमरावतीकडे प्रयाण करणार आहेत. दुपारी ४.३० ते सायंकाळी ६.३० या वेळेत ते जिल्हा परिषद कार्यालय, अमरावती येथे राखीव कार्यक्रमासाठी उपस्थित राहतील. या दरम्यान विविध विभागांचा आढावा, प्रलंबित विकासकामे तसेच प्रशासनाशी चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
जिल्हा परिषद कार्यालयात त्यांच्या उपस्थितीत महत्त्वाच्या विषयांवर चर्चा अपेक्षित असून संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
सायंकाळी ७ वाजता पालकमंत्री श्री. बावनकुळे हे अमरावती येथून नागपूरकडे प्रयाण करणार आहेत.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0