मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानासाठी सागरा, मुधोली गावाची निवड 

Jun 4, 2026 - 14:27
 0  0
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानासाठी सागरा, मुधोली गावाची निवड 

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानासाठी सागरा, मुधोली गावाची निवड 

जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी जिल्हा परिषद जालना चमुकडून पडताळणी 
भद्रावती  
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी  भद्रावती तालुक्यातील सागरा, मुधोली या दोन गावांची निवड झाली असून जिल्हा परिषद जालन्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.कृष्णकांत कनवारिया यांचे नेतृत्वात या दोन्ही गावांचे अंतिम मूल्यांकन करण्यात आले.
 राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत राबविण्यात आलेल्या या अभियानात तालुक्यातील ग्रामपंचायतनी सहभाग घेतला यापूर्वी नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर चमूने 14 ग्रामपंचायतचे तालुकास्तरावर मूल्यांकन करून सागरा व मुधोली या दोन गावांची जिल्हास्तरासाठी निवड केली होती.
जालना जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.कृष्णकांत कनवारिया यांच्या नेतृत्वात उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप पवार,विस्तार अधिकारी पंचायत चव्हाण व इतर सदस्यानी अभियानातील आठ घटकाअंतर्गत तपासणी करण्यात आली.जसे एक  ते तेहतीस ग्रामपंचायत नोंदवह्या, संपूर्ण आवश्यक अभिलेखे, लोकसहभागातून ग्राम स्वच्छता, श्रमदानातून सभागृह बांधकाम, निराधारगृह ,गोरक्षण,स्मशानभूमीतील फळबाग लागवड,वाचनालय, जिल्हा परिषद शाळा,अंगणवाडी वृक्ष लागवड, रेनवॉटर हार्वेस्टिंग कामासह ग्रामपंचायत ने राबविलेल्या नावीन्यपूर्ण उपक्रमाची पाहणी समितीकडून करण्यात आली.समितीने समाधान व्यक्त केले.
सदर अभियान तपासणी करता जिल्हास्तरावरून अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कल्पना क्षीरसागर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मीना साळुंखे व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आशुतोष सपकाळ,बाविप्रअ पूनम गेडाम ,विस्तार अधिकारी पंचायत प्रणाली भागवत, प्रमोद ढोरे कृषी अधिकारी महेंद्र डाखरे, सागरा ग्रामपंचायतचे प्रशासक शंकर रासेकर,ग्रापअ सुशिल शिंदे,मुधोली ग्रामपंचायतचे प्रशासक बंडुजी नन्नावरे,ग्रापअ विजय पचारे सह पस स्तरावरील अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0