महागाईविरोधात भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन

Jun 1, 2026 - 15:22
 0  0
महागाईविरोधात भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन

महागाईविरोधात भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन

अमरावती, दि. १ जून : वाढती महागाई, गॅस सिलेंडर, पेट्रोल-डिझेल व जीवनावश्यक वस्तूंच्या वाढलेल्या किमतींच्या निषेधार्थ भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या अमरावती जिल्हा कौन्सिलच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने करण्यात आली. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे निवेदन सादर करण्यात आले.

निवेदनात घरगुती गॅस सिलेंडरचे दर कमी करणे, पेट्रोल-डिझेलवरील कर कमी करणे, महागाई नियंत्रणासाठी विशेष कृती आराखडा जाहीर करणे, गरीब व मध्यमवर्गीयांना अधिक अनुदान देणे तसेच शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात डिझेल उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली.

यावेळी भाकपचे राज्य सचिव मंडळ सदस्य कॉ. तुकाराम भस्मे, जिल्हा सचिव कॉ. सुनील मेटकर, डॉ. ओमप्रकाश कुटेपाटे, कॉ. अशोक सोनारकर यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0