पर्यावरण दिनी भटोरीत वृक्षारोपणासह ‘आऊट ऑफ सिल्याबस’ चित्रपटाचे अनोखे प्रमोशन

Jun 6, 2026 - 16:38
 0  0
पर्यावरण दिनी भटोरीत वृक्षारोपणासह ‘आऊट ऑफ सिल्याबस’ चित्रपटाचे अनोखे प्रमोशन

पर्यावरण दिनी भटोरीत वृक्षारोपणासह ‘आऊट ऑफ सिल्याबस’ चित्रपटाचे अनोखे प्रमोशन

मूर्तीजापूर : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत भटोरी गावात वृक्षारोपण आणि सामाजिक संदेश देणाऱ्या ‘आऊट ऑफ सिल्याबस’ चित्रपटाचे अनोख्या पद्धतीने प्रमोशन करण्यात आले. स्मशानभूमी परिसरात झालेल्या या उपक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

ग्रामविकास अधिकारी प्रा. रूपाली नांदुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तीक्ष्णगत संस्थेचे सामाजिक कार्यकर्ते गजानन तायडे यांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी गावातील विविध भागांत वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.

कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना प्रा. रूपाली नांदुरकर यांनी पर्यावरण संरक्षणाची शपथ देत प्रत्येकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याचे आवाहन केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे उपस्थितांमध्ये पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण झाली.

यावेळी ‘आऊट ऑफ सिल्याबस’ या आगामी चित्रपटाचेही प्रमोशन करण्यात आले. चित्रपट युवकांना सकारात्मक दिशा देणारा असून समाजातील विविध विषयांवर भाष्य करणारा असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले.

सरपंच विकीभाऊ कावरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमात शरद नंदे, गजानन सोळंके, प्रमोद कावरे, बंडू कावरे, शुभम सुरजुसे, प्रवीण मोरे, रोशन इंगळे तसेच तीक्ष्णगत संस्थेचे निलेश तायडे, सुनील अंजनकर आणि शिव तायडे यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.

पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक जनजागृतीचा संगम घडवून आणणाऱ्या या उपक्रमाचे परिसरात कौतुक होत आहे.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0