अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील NICU कक्षाला लागलेल्या आगीत तीन नवजात बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर आता रुग्णालयांच्या अग्निसुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर

Sep 5, 2026 - 13:18
 0  0
अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील NICU कक्षाला लागलेल्या आगीत तीन नवजात बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर आता रुग्णालयांच्या अग्निसुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर

अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील NICU कक्षाला लागलेल्या आगीत तीन नवजात बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर आता रुग्णालयांच्या अग्निसुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

या पार्श्वभूमीवर महिला राजसत्ता आंदोलनाच्या वतीने आरोग्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. हे निवेदन अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत सादर करण्यात आले असून, मा. निवासी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन सुपूर्द करण्यात आले.

या घटनेची सखोल, निष्पक्ष आणि तांत्रिक चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे.

तसेच महाराष्ट्रातील सर्व रुग्णालयांचे Fire आणि Electrical Safety Audit तातडीने करावे, NICU, ICU आणि प्रसूती विभागातील अग्निसुरक्षा तसेच विद्युत व्यवस्था तपासावी, अशी मागणीही करण्यात आली.

रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना अग्निसुरक्षेचे प्रशिक्षण आणि नियमित मॉक ड्रिल देण्यात यावेत, तसेच भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी राज्यस्तरावर विशेष रुग्णालय सुरक्षा अभियान राबवावे, अशी मागणी आंदोलकांनी केली.

तीन निष्पाप बालकांचा मृत्यू ही अत्यंत वेदनादायक घटना असून, अशा दुर्घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी शासनाने तातडीने ठोस पावले उचलावीत, अशी भूमिका निवेदनातून मांडण्यात आली.

या निवेदनावेळी महिला राजसत्ता आंदोलनासह संभाजी ब्रिगेड आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, अमरावती यांचा सहभाग असल्याची माहिती देण्यात आली.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0