दिवंगत अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त 'जनसेवा सप्ताह'ला सुरुवात

Jul 23, 2026 - 12:11
 0  0
दिवंगत अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त 'जनसेवा सप्ताह'ला सुरुवात

दिवंगत अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त 'जनसेवा सप्ताह'ला सुरुवात

रक्तदान शिबिरात आ. संजय खोडके यांचे रक्तदान; वृक्षारोपणातून समाजसेवेचा संदेश

अमरावती | प्रतिनिधी | २२ जुलै : दिवंगत उपमुख्यमंत्री तथा लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त अमरावतीत 'जनसेवा सप्ताह' उपक्रमाला सुरुवात करण्यात आली. जुना बायपास मार्गावरील सखा मंगलम येथे आयोजित रक्तदान शिबिरात विधानपरिषद आमदार संजय खोडके यांनी रक्तदान करून सहभाग नोंदवला.

यावेळी बोलताना आ. संजय खोडके म्हणाले की, वाढदिवस किंवा जयंती साजरी करताना दिखावा करण्याऐवजी रक्तदान, वृक्षारोपण आणि समाजोपयोगी उपक्रम राबवणे हीच खरी लोकसेवा आहे. विकासाच्या प्रत्येक टप्प्यावर अजितदादा पवार यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाची आठवण येते. त्यांचे कार्य आणि विचार आजही समाजासाठी प्रेरणादायी आहेत.

रक्तदान हे एखाद्याला नवजीवन देणारे महान दान असून प्रत्येक निरोगी नागरिकाने नियमित रक्तदानाचा संकल्प करावा, असा संदेशही त्यांनी दिला.

कार्यक्रमात आयोजक तथा मनपा स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर यांनी रक्तदानाचे महत्त्व स्पष्ट करत युवकांना स्वयंस्फूर्तीने रक्तदान चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन केले. शिबिरातील रक्तदात्यांचा प्रमाणपत्र व वृक्ष भेट देऊन सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी यश खोडके, अविनाश मार्डीकर, प्रशांत डवरे, ममता आवारे, मंगेश मनोहरे, चंदू खेडकर, मनीष बजाज, प्रमोद महल्ले, प्रशांत (गुड्डू) धर्माळे, अर्चना पाटील, अॅड. किशोर शेळके, रिनाताई नंदा, महेंद्र भुतडा, भोजराज काळे, भूषण बनसोड, लकी नंदा, प्रवीण कदम, पप्पू खत्री, भास्करराव ढेवले, ऋतुराज राऊत, राजू टाके यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व मोठ्या संख्येने रक्तदाते उपस्थित होते.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0