श्री आईबाबा बहूउद्देशीय संस्था सालतवाडा द्वारे आयोजित राष्ट्रमाता जिजाऊ पुण्यतिथीनिमित्तग्राम सालतवाडा येथे भव्य मोफत रोग निदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

Jun 18, 2026 - 15:09
 0  0
श्री आईबाबा बहूउद्देशीय संस्था सालतवाडा द्वारे आयोजित राष्ट्रमाता जिजाऊ पुण्यतिथीनिमित्तग्राम सालतवाडा येथे भव्य मोफत रोग निदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

श्री आईबाबा बहूउद्देशीय संस्था सालतवाडा द्वारे आयोजित राष्ट्रमाता जिजाऊ पुण्यतिथीनिमित्तग्राम सालतवाडा येथे भव्य मोफत रोग निदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

बुधवार दि. 17 जून राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून श्री आईबाबा बहुउद्देशीय संस्था, सालतवाडा यांच्या वतीने हनुमान मंदिर, सालतवाडा येथे भव्य मोफत रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून सुमारे २०० नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला.कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. तुषार बाहेस्कार (एम.डी. मेडिसिन) यांच्या हस्ते राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. हरीश पातोंड (एम.एस. जनरल सर्जरी), डॉ. आकांक्षा पातोंड (एम.एस. नेत्ररोग तज्ज्ञ), डॉ. शहाजहा (बी.ए.एम.एस.), तंटामुक्ती  अध्यक्ष विजय उमाळे, रोजगार सेवक मधुकर चहाकार तसेच जय बजरंग मंडळाचे अध्यक्ष प्रमोद इंगोले उपस्थित होते.
शिबिरामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांकडून सर्वसाधारण आरोग्य तपासणी, नेत्ररोग तपासणी, आवश्यक आरोग्य मार्गदर्शन, मोफत वैद्यकीय सल्ला व रोग निदान करण्यात आले. विविध आजारांबाबत नागरिकांना मार्गदर्शन करून आरोग्याविषयी जनजागृती करण्यात आली. तसेच गरजू रुग्णांना मोफत औषधांचे वाटप करण्यात आले.गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिबिराचा लाभ घेतला. ग्रामीण भागातील नागरिकांना तज्ज्ञ वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात आले.या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी श्री आईबाबा बहुउद्देशीय संस्था, सालतवाडा येथील पदाधिकाऱ्यांसह विजय उमाळे, मधुकर चहाकार, प्रमोद इंगोले, सूरज गावंडे, दुर्योधन वानखडे, विलेश वानखडे तसेच गावकऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.कार्यक्रमाच्या शेवटी संस्थेचे अध्यक्ष गजानन चव्हाण यांनी उपस्थित डॉक्टर, मान्यवर व ग्रामस्थांचे आभार मानले. समाजहितासाठी राबविण्यात येणाऱ्या अशा उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सेवा उपलब्ध होण्यास मोठी मदत होत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0