मूल असो वा नातवंडे… त्यांच्या वयानुसार रात्री किती वाजता झोपावे? जाणून घ्या
आरोग्य चांगले ठेवण्यासाठी झोप ही औषधासारखीच महत्त्वाची आहे. योग्य वेळी आणि पुरेशी झोप घेतल्यास शरीराला ऊर्जा मिळते, रोगप्रतिकारक शक्ती मजबूत राहते आणि मानसिक तणाव दूर होतो. पण झोपेची गरज वयानुसार वेगळी असते. त्यामुळे मूल, तरुण किंवा वृद्ध – प्रत्येकाने आपापल्या वयानुसार झोपेची काळजी घेणे गरजेचे आहे.
लहान मुलांसाठी (५ ते १२ वर्षे)
-
झोपेची गरज : ९ ते १२ तास
-
झोपण्याची सर्वोत्तम वेळ : रात्री ८ ते ९
या वयात शरीर आणि मेंदूचा विकास जलद गतीने होत असल्याने पुरेशी झोप आवश्यक आहे.
किशोरवयीन (१३ ते १८ वर्षे)
-
झोपेची गरज : ८ ते १० तास
-
झोपण्याची सर्वोत्तम वेळ : रात्री १० ते ११.३०
अभ्यास, मोबाइल आणि स्क्रीन टाइममुळे झोपेची कमतरता होते. पण मेंदू निरोगी ठेवण्यासाठी योग्य वेळेत झोपणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
प्रौढ (१८ ते ६४ वर्षे)
-
झोपेची गरज : ७ ते ९ तास
-
झोपण्याची सर्वोत्तम वेळ : रात्री १० ते ११.३०
जर या वयोगटातील लोक नियमित उशिरा झोपले, तर थकवा, हृदयविकार आणि मानसिक तणावाचा धोका वाढतो.
ज्येष्ठ नागरिक (६५ वर्षांवरील)
-
झोपेची गरज : ७ ते ८ तास
-
झोपण्याची सर्वोत्तम वेळ : रात्री ९ ते १०
सकाळी लवकर उठण्याची सवय वृद्धांसाठी चांगली मानली जाते. यामुळे पचन सुधारते, ताण कमी होतो आणि शरीर हलके वाटते.
झोप का आहे इतकी महत्त्वाची?
-
हृदयविकाराचा धोका कमी होतो
-
स्मरणशक्ती आणि लक्ष केंद्रीत करण्याची क्षमता वाढते
-
रोगप्रतिकारक शक्ती मजबूत राहते
-
शरीराची दुरुस्ती (Cell Repair) नैसर्गिकरीत्या होते
-
मानसिक शांतता मिळते
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0