महिलांच्या सुरक्षेसाठी कठोर ‘शक्ती कायदा’ लागू करा; राष्ट्रमाता जिजाऊ ब्रिगेडची मागणी
महिलांच्या सुरक्षेसाठी कठोर ‘शक्ती कायदा’ लागू करा; राष्ट्रमाता जिजाऊ ब्रिगेडची मागणी
राष्ट्रमाता जिजाऊ ब्रिगेड यांच्या वतीने महिला व बालकांवरील वाढत्या अत्याचारांच्या घटनांविरोधात केंद्र सरकारने देशभर कठोर ‘शक्ती कायदा’ लागू करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात पंतप्रधानांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन देण्यात आले.
निवेदनात महिला व बालकांवरील गंभीर गुन्ह्यांमध्ये फाशी किंवा जन्मठेपेची शिक्षा, गुन्ह्यांचा तपास व न्यायालयीन निकाल २१ ते ३० दिवसांत पूर्ण करण्याची तरतूद, प्रत्येक जिल्ह्यात विशेष तपास पथकाची स्थापना तसेच सोशल मीडियावरील महिलांविरोधातील बदनामी, अश्लील जोक्स, शिवीगाळ व ऑनलाइन छळाविरोधात कठोर कारवाईची मागणी करण्यात आली.
संघटनेने देशातील महिला सुरक्षित आणि भयमुक्त वातावरणात जगाव्यात यासाठी केंद्र सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, असे निवेदनात नमूद केले आहे. हे निवेदन शिवानी मैथिली यांच्या नेतृत्वात सादर करण्यात आले.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0