24 तासांत उलगडले सैय्यद नाजीम हत्याकांड; दोन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात
24 तासांत उलगडले सैय्यद नाजीम हत्याकांड; दोन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात
अमरावती : फ्रेजरपुरा पोलिसांनी सैय्यद नाजीम हत्या प्रकरणाचा अवघ्या 24 तासांत छडा लावत दोन आरोपींना अटक केली आहे. पैशांच्या व्यवहारातून झालेल्या वादातून ही हत्या झाल्याची माहिती तपासात समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवार बाजार मैदान परिसरात फिरत असताना सैय्यद नाजीम हा फोनवरून निशांत भोवते याच्याशी पैशांच्या देवाणघेवाणीबाबत बोलत होता. त्यानंतर तो मदीना मांडा सेंटर परिसरात गेला असता तेथे निशांत भोवते आणि यशराज कोरी यांच्यासोबत त्याचा वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन आरोपींनी नाजीमवर चाकूने हल्ला केला.
गंभीर जखमी अवस्थेत नाजीमला इर्विन रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
घटनेनंतर फ्रेजरपुरा पोलिसांच्या डीबी पथकाने तातडीने तपास सुरू केला. गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी निशांत भोवते याला एकता नगर परिसरातून ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर दुसरा आरोपी यशराज उर्फ राहुल कोरी यालाही सुपर हायवे परिसरातून अटक करण्यात आली.
या प्रकरणाचा पुढील तपास फ्रेजरपुरा पोलीस करीत आहेत. कारवाई पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
[4:03 pm, 12/05/2026] Prashant Nager: ......
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0