अमरावती : घातक शस्त्रांसह तरुण अटकेत, गुन्हे शाखेची कारवाई

Jul 24, 2026 - 12:47
 0  0
अमरावती : घातक शस्त्रांसह तरुण अटकेत, गुन्हे शाखेची कारवाई

अमरावती : घातक शस्त्रांसह तरुण अटकेत, गुन्हे शाखेची कारवाई

अमरावती, 23 जुलै : अमरावती शहर गुन्हे शाखेने गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत एका तरुणाला तलवार, कोयता आणि कट्यारसह ताब्यात घेतले. ही कारवाई लालखडी चौक ते नवसारी चौक मार्गावर करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अब्दुल रहेमान अब्दुल हबीब (वय 22, रा. इमाम नगर, अमरावती) हा प्लास्टिकच्या पोत्यात घातक शस्त्रे घेऊन फिरत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून संशयिताला ताब्यात घेण्यात आले.

त्याच्या ताब्यातून एक स्टीलची तलवार, एक लोखंडी कोयता (गंगवा) आणि एक स्टीलची कट्यार असा सुमारे 6 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी नागपुरी गेट पोलीस ठाण्यात आर्म्स अॅक्ट कलम 4/25 तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 135 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल वर व पोलीस निरीक्षक दिनेश दहातोंडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0