Petrol Disel Price : युद्धामुळे भारतावर मोठं संकट, ही गोष्ट खरेदी करायची असल्यास खिसा होणार रिकामा!

Mar 1, 2026 - 16:09
 0  0
Petrol Disel Price : युद्धामुळे भारतावर मोठं संकट, ही गोष्ट खरेदी करायची असल्यास खिसा होणार रिकामा!

इराण आणि इस्रायल यांच्यात भीषण युद्धाला सुरुवात झाली आहे. या युद्धाचा परिणाम भारतावरही होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भारतात इंधनाचा भाव वाढू शकतो, असे म्हटले जात आहे.

Iran Israel War : सध्या इराण आणि इस्रायल यांच्यात भीषण युद्धाला सुरूवात झाली आहे. या युद्धात अमेरिकेनेही उडी घेतलेली आहे. अमेरिका आणि इस्रायल हे दोन्ही देश इराणवर संयुक्त कारवाई करत आहेत. इराणनेही वेगवेगळ्या सात आखाती देशांतील अमेरिकन लष्करावर हल्ले केले आहेत. या हल्ल्यांच्या प्रत्युत्तरादाखल इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई हेदेखील युद्धात ठार झाले आहेत. या युद्धामुळे आता जगात इंधनाचा भाव गगनाला भिडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कच्च्या तेलाचा भाव थेट 100 डॉलर्स प्रतिबॅरलवर पोहोचतो की काय? अशी भीती व्यक्त केली जात आहे. असे असतानाच आता जगात इंधनाची किंमत वाढली तर भारतात काय होणार? असे विचारले जात आहे. भारताच्या प्लॅनबाबत आता मोठी अपडेट समोर आली आहे.

होर्मुजची खाडी बंद झाल्याने जगावर काय परिणाम पडणार?

इराणचे सर्वोच्च नेते खामेनेई यांच्या हत्येनंतर युद्ध आणखी भडकले आहे. या कारवाईनंतर इराणने प्रत्युत्तर म्हणून थेट होर्मुजच्या खाडीला बंद केले आहे. होर्मुजची खाडी ही जगात तेलाच्या व्यापारासाठी खूप महत्त्वाचा जलमार्ग आहे. याच जलमार्गाद्वारे भारतासह इतरही देशांत कच्च्या तेलाचा पुरवठा होतो. जगाला पुरवले जाणारे साधारण 20 टक्के कच्च्या तेलाचा पुरवठा थेट होर्मुजच्या खाडीतूनच होतो. परंतु आता इराणने होर्मुजची खाडीच बंद केल्यामुळे कच्च्या तेलाची किंमत वाढण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. भारतात येणारे कच्चे तेल महागणार असेल तर पर्यायाने पेट्रोल आणि डिझेलची किंमतही वाढू शकते.

कच्च्या तेलाच्या किमती 100 डॉलरपेक्षा जास्त होणार?

इराण-इस्रायल यांच्यात युद्ध चालू झाल्यानंतर होर्मुजची खाडी बंद करण्यात आली आहे. त्यामुळे जगभरात इंधन पुरवठ्याचा तुटवडा निर्माण होऊ शकतो. हे युद्ध सुरू होताच साधारण 6 डॉलर प्रति बॅरल दराने कच्च्या तेलाची किंमत वाढली आहे.कच्च्या तेलाचा सध्याचा भाव 73 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचला आहे. इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्ध दीर्घकाळ छालण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे हा भाव 110 डॉलर प्रति बॅरलपर्यंत वाढू शकतो. कच्च्या तेलाची आयात चढ्या दराने करावी लागत असेल तर भविष्यात पेट्रोल, डिझेल तसेच इतर इंधनाचा दरही वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारत या आव्हानाल कसे तोंड देणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0