कथोरा येथे एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली.
नांदगाव पेठ पोलीस स्टेशन परिसरातील घटना
अमरावती/ २७ डिसेंबर – नांदगाव पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या कथोरा बु. गावातील २७ वर्षीय तरुणाने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवार, २६ फेब्रुवारी रोजी घडली. मृत तरुणाचे नाव आकाश आत्माराम मेश्राम (२७) आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत आकाश मेश्राम हा दारूचे व्यसन करत होता. २६ फेब्रुवारी रोजी त्याने आपल्या राहत्या घरी गळफास घेतला. त्याच्या कुटुंबीयांनी त्याला तात्काळ जिल्हा रुग्णालयात आणले. तपासणीनंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. शुभम नारायण मेश्राम (२९) यांच्या तक्रारीवरून नांदगाव पेठ पोलिसांनी अपघाती घटनेचा गुन्हा दाखल केला आहे.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0