गडगडेश्वर ते रविनगर रोड परिसरात प्लास्टिक जप्ती व डस्टबिन तपासणी विशेष मोहीम; महावीर दूध डेअरीवर ₹५,००० दंड*

Jun 14, 2026 - 15:19
 0  0
गडगडेश्वर ते रविनगर रोड परिसरात प्लास्टिक जप्ती व डस्टबिन तपासणी विशेष मोहीम; महावीर दूध डेअरीवर ₹५,००० दंड*

*गडगडेश्वर ते रविनगर रोड परिसरात प्लास्टिक जप्ती व डस्टबिन तपासणी विशेष मोहीम; महावीर दूध डेअरीवर ₹५,००० दंड*
अमरावती, दि. १२ जून २०२६ : अमरावती महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा व अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांच्या आदेशानुसार तसेच वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता) डॉ. अजय जाधव व सहाय्यक आयुक्त मनोज शहाळे झोन क्र.५ भाजीबाजार यांच्या मार्गदर्शनाखाली गडगडेश्वर ते रविनगर रोड परिसरात प्लास्टिक जप्ती व डस्टबिन तपासणी विशेष मोहीम राबविण्यात आली.

या मोहिमेदरम्यान एकूण १४ आस्थापनांची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान काही ठिकाणी शासनाने प्रतिबंधित केलेल्या प्लास्टिकचा वापर होत असल्याचे निदर्शनास आले. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या संबंधित आस्थापनांवर महानगरपालिकेकडून नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात आली.

यामध्ये महावीर दूध डेअरी या आस्थापनामध्ये प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर आढळून आल्याने संबंधित आस्थापनावर ₹५०००/- दंड आकारण्यात आला.

सदर मोहिमेत प्लास्टिक नोडल अधिकारी ए. के. गोहर, ज्येष्ठ स्वास्थ निरीक्षक राजेश राठोड, स्वास्थ निरीक्षक सचिन सैनी, सागर इंगोले व अनिकेत फुके उपस्थित होते.

महानगरपालिकेने नागरिक व व्यावसायिक आस्थापनांना प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर टाळून स्वच्छता नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले असून अशा मोहिमा पुढेही नियमितपणे राबविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0