लोकमान्य कनिष्ठ महाविद्यालय भद्रावती 100% निकालाची परंपरा कायम
लोकमान्य कनिष्ठ महाविद्यालय भद्रावती 100% निकालाची परंपरा कायम
(भद्रावती)
लोकमान्य विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, भद्रावती येथील विज्ञान विभागाची 100% निकालाची परंपरा कायम बारावी बोर्डाच्या परीक्षेत विज्ञान विभागाचे एकूण 75 विद्यार्थी बसले होते आणि ते सर्व उत्तीर्ण झाले त्यामध्ये संस्कार विनोद बाळेकळमकर याला 82. 67% गुण घेऊन प्रथम आला, तसेच नुपूर विनोद दातारकर 82.17% गुण घेऊन दुसरी तर गौरी रामकृष्ण गुंडावार 80. 17% गुण घेऊन तिसऱ्या क्रमांकावर आली.
कला विभागाचा निकाल 71.81% लागला असून, प्रणय रमाकांत दोहतरे याला 77 % गुण घेऊन प्रथम तर आदित्य गणपत सरपाते 65.50% गुण घेऊन दुसरा तर भूमिका दिलीप चूदरी ६४% गुण घेऊन तिसरी आली.
सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे प्राचार्य रूपचंद धारणे, उपप्राचार्य प्रफुल वाटे, पर्यवेक्षक आशुतोष सुरावार तसेच कनिष्ठ महाविद्यालयीन प्रमुख नितीन लांजेवार, पवन गौरकार, आशिष आकोजवार, मुंजे मॅडम,रोडे मॅडम, विजय गायकवाड, किशोर किरमिरे, अमोल मालके, गुंडावार मॅडम, शेंडे मॅडम,किंंजळे मॅडम त्याचबरोबर लोकसेवा मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांतजी गुंडावार, ठेंगणे सर, उल्हासजी भास्करवार, अमित गुंडावार, सचिन सरपटवार, पाम्पट्टीवर सर तसेच लोकमान्य ज्ञानपीठच्या प्राचार्या पुनम ठावरी मॅडम यांनी सुद्धा सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0