सरस्वती नगरातील मंगळसूत्र चोरीचा गुन्हा उघड; 90 हजारांचे सोन्याचे दागिने जप्त
सरस्वती नगरातील मंगळसूत्र चोरीचा गुन्हा उघड; 90 हजारांचे सोन्याचे दागिने जप्त
अमरावती: गाडगेनगर पोलिसांनी सरस्वती नगर परिसरातील घरफोडी व मंगळसूत्र चोरीचा गुन्हा उघडकीस आणत सुमारे 90 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सरस्वती नगर येथील रहिवासी मंगेश उत्तमराव आंबेकर यांनी 1 जून 2026 रोजी गाडगेनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. एप्रिल महिन्यात लग्नसमारंभासाठी बाहेरगावी जाताना पत्नीचे अंदाजे 5 ते 6 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र घरातच राहिले होते. घरी परतल्यानंतर ते आढळून न आल्याने चोरीची तक्रार देण्यात आली.
तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. तपासादरम्यान घरात येणाऱ्या एका अल्पवयीन मुलाची चौकशी करण्यात आली. त्यातून शंतनू प्रदीप पवार (वय 24, रा. चौधरी लाईन, अमरावती) याच्या सांगण्यावरून 12 वर्षांखालील मुलाकडून चोरी घडवून आणल्याचे निष्पन्न झाले.
चोरी केलेले मंगळसूत्र वितळवून सोन्याची लगड तयार करण्यात आल्याचे तपासात उघड झाले. आरोपीने गुन्ह्याची कबुली देत अंदाजे 90 हजार रुपये किमतीची सोन्याची लगड पोलिसांच्या ताब्यात दिली. पंचासमक्ष ती जप्त करण्यात आली असून गुन्ह्याचा यशस्वी छडा लावण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपायुक्त शाम घुगे, सहाय्यक पोलीस आयुक्त कैलाश पुंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरखनाथ जाधव यांच्या नेतृत्वात डीबी पथकाने केली. तपास पथकात पोउपनि योगेश श्रीवास व त्यांच्या सहकाऱ्यांचा सहभाग होता.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0