अकोल्यात 2,945 लिटर पेट्रोलसदृश साठा जप्त! | शेड कुणाचे? मोठे प्रश्न उपस्थित

Sep 5, 2026 - 13:52
 0  0
अकोल्यात 2,945 लिटर पेट्रोलसदृश साठा जप्त! | शेड कुणाचे? मोठे प्रश्न उपस्थित

अकोला जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आपातापा गावाच्या हद्दीतील एका शेडमध्ये तब्बल 2 हजार 945 लिटर पेट्रोलसदृश पदार्थाचा साठा आढळून आला आहे.

गुप्त माहितीच्या आधारे महसूल आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने संयुक्त कारवाई करत हा साठा जप्त केला. तब्बल नऊ तासांहून अधिक काळ चाललेल्या या कारवाईत जप्त मुद्देमालाची किंमत सुमारे 2 लाख 82 हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे.

या प्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध जीवनावश्यक वस्तू अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे.

मात्र या कारवाईनंतर अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. हे शेड नेमके कुणाचे? एवढ्या मोठ्या प्रमाणात हा पदार्थ कुठून आणला? तो नेमका कशासाठी साठवण्यात आला होता? तसेच या साठ्याचा बनावट दारू निर्मितीशी काही संबंध आहे का, याचाही तपास होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, या प्रकरणाला राजकीय व्यक्तींशी जोडणाऱ्या चर्चा स्थानिक पातळीवर सुरू आहेत. मात्र या चर्चांना अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीचा संबंध असल्याचे सध्या ठामपणे म्हणता येणार नाही.

आता जप्त केलेला पदार्थ प्रत्यक्षात काय आहे, त्याचा स्रोत कोणता आणि या संपूर्ण साठ्यामागे आणखी कुणाचा सहभाग आहे का, याचा खुलासा तपास आणि रासायनिक अहवालातून होणार आहे.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0