पावसाळ्यापूर्व राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाचे धडक मोहिमाचे सुरुवात.... सार्वजनिक आरोग्य विभाग
पावसाळ्यापूर्व राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाचे धडक मोहिमाचे सुरुवात.... सार्वजनिक आरोग्य विभाग
महानगरपालिका अमरावती तसेच जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने बाहेर गावातून आलेले. पुणे मुंबईहून आलेले मजूर यांचे अमरावती शहरांमध्ये ज्या ज्या ठिकाणी हे राहतात त्या त्या ठिकाणी जाऊन धडक मोहिमेद्वारे त्यांचे रक्त तपासणी करण्यात आले. या रक्त तपासणीमध्ये RDK द्वारे तपासणी करून लगेच रिझल्ट दाखविण्यात आले त्यांची मलेरियाची तपासणी करण्यात आली व स्लाईट सुद्धा घेण्यात आली... यामध्ये श्याम चौक. राजकमल चौक. इरविन चौक.. नेहरू मैदान... येथे राहणारे सर्व मजूर लोकांचे जे रोडवर इकडे तिकडे फिरतात त्यांच्या सर्वांचे रक्त नमुने तपासणी करण्यात आले.... वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर विशाल काळे सर यांचे आदेशानुसार. यावेळी जिल्हा हिवताप अधिकारी डॉक्टर शरद जोगी . यांनी उपस्थित मजुरांना मार्गदर्शन केले तसेच पावसाळ्या सुरू होणार आहे त्याकरिता उपाय योजना करण्याचे सल्ला दिली तसेच शहर. साथरोग अधिकारी डॉक्टर रुपेश खडसे.. यांनी उपस्थित लोकांनी सर्वांनी रक्त तपासणी करावी याबद्दल मार्गदर्शन केले तसेच आरोग्य निरीक्षक शेख हैदर अली. शशी जयस्वाल यांनी या धडक मोहिमेत घेण्याकरिता. सर्व आरोग्य सेवक यांना बोलावून कार्यक्रमाचे नियोजन केले.. तसेच महानगरपालिका तसेच जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालय येथील सर्व आरोग्य सेवक उपस्थित होते....
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0