नेत्रदानाची लोकचळवळ अधिक व्यापक करण्यासाठी १० जूनला अमरावतीत जनजागृती रॅली
नेत्रदानाची लोकचळवळ अधिक व्यापक करण्यासाठी १० जूनला अमरावतीत जनजागृती रॅली
अमरावती, दि. ६ जून : "माझ्या जीवनाची अंतिम भेट – राष्ट्रासाठी" या संदेशातून नेत्रदानाबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी हरिना फाऊंडेशनच्या वतीने जागतिक नेत्रदान दिनानिमित्त १० जून रोजी भव्य जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन नेत्रदानाचा संदेश घराघरात पोहोचवावा, असे आवाहन विधान परिषद सदस्य संजय खोडके यांनी केले.
हरिना फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार संजय खोडके यांची भेट घेऊन रॅलीचे निमंत्रण दिले. यावेळी नेत्रदान जनजागृतीसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली. तसेच डिजिटल माध्यमातून नेत्रदान संकल्प नोंदणीची सुविधा सुरू करण्यात आल्याचेही सांगण्यात आले.
यावेळी बोलताना आमदार खोडके म्हणाले की, नेत्रदानामुळे अंधत्वावर मात करण्यास मदत होते आणि दृष्टी गमावलेल्या व्यक्तींना नव्याने जग पाहण्याची संधी मिळते. त्यामुळे प्रत्येकाने नेत्रदानाबाबत सकारात्मक विचार करून या सामाजिक चळवळीत सहभागी व्हावे.
१० जून रोजी सायंकाळी ५.३० वाजता नेहरू मैदान येथून सुरू होणाऱ्या या पदयात्रेत सामाजिक संस्था, स्वयंसेवक, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. नेत्रदानाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी ही रॅली महत्त्वाची ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
या प्रसंगी हरिना फाऊंडेशनचे अध्यक्ष मनोज राठी, संयोजन समिती अध्यक्ष निलेश चिठोरे, आयोजन समितीचे अध्यक्ष पुरणलाल हबलानी यांच्यासह विविध क्षेत्रातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. नेत्रदानाच्या माध्यमातून समाजसेवेचा एक नवा आदर्श निर्माण करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0