स्वच्छ नाले, सुरक्षित अमरावती; आयुक्त वर्षा लड्डा यांची प्रत्यक्ष पाहणी
स्वच्छ नाले, सुरक्षित अमरावती; आयुक्त वर्षा लड्डा यांची प्रत्यक्ष पाहणी
अमरावती, दि. १२ जून : आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा यांनी शहरातील विविध भागांतील नाल्यांची पाहणी करून स्वच्छता व गाळ काढण्याच्या कामांचा आढावा घेतला. नमुना गल्ली, अंबानाला, भुतेश्वर चौक, पन्नालाल नगर, समाधान नगर आणि मालवीय चौक परिसरातील नाल्यांची तपासणी करत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.
पाहणीदरम्यान नाल्यांमध्ये साचलेला गाळ, प्लास्टिक व कचऱ्यामुळे जलनिस्सारणात अडथळे निर्माण होत असल्याचे निदर्शनास आले. यामुळे पावसाळ्यात पाणी तुंबण्याचा धोका वाढत असल्याने अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.
नागरिक, हॉकर्स व व्यावसायिकांनी नाल्यांमध्ये कचरा टाकणे टाळावे, असे आवाहन करत शहर जलभरावमुक्त ठेवण्यासाठी सर्वांनी महानगरपालिकेला सहकार्य करण्याचे आवाहन वर्षा लड्डा यांनी केले. तसेच कचरा टाकणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0