जागतिक योगासन स्पर्धेत भद्रावतीच्या डॉ. पूजा देऊरकर यांचे सुवर्ण यश

Jun 7, 2026 - 12:19
 0  0
जागतिक योगासन स्पर्धेत भद्रावतीच्या डॉ. पूजा देऊरकर यांचे सुवर्ण यश

जागतिक योगासन स्पर्धेत भद्रावतीच्या डॉ. पूजा देऊरकर यांचे सुवर्ण यश

७५ देशांच्या स्पर्धकांमध्ये चमकदार कामगिरी; भद्रावतीच्या शिरपेचात मानाचा तुरा

भद्रावती : भद्रावती शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारी अभिमानास्पद कामगिरी करत डॉ. पूजा देऊरकर यांनी जागतिक योगासन स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून देशाचे नाव उज्ज्वल केले आहे. त्यांच्या या यशामुळे भद्रावतीसह संपूर्ण जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

डॉ. पूजा देऊरकर यांचा यशाकडे जाणारा प्रवास संघर्षमय राहिला आहे. एका गंभीर आजाराशी झुंज देत असताना त्यांना आहारातही अनेक बंधने पाळावी लागत होती. आर्थिक परिस्थितीही बेताची असतानाही त्यांनी हार न मानता योगासन हेच आपले ध्येय मानून सातत्यपूर्ण सराव सुरू ठेवला.

जिल्हास्तर, राज्यस्तर, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करत त्यांनी जागतिक स्पर्धेपर्यंत मजल मारली. या स्पर्धेत तब्बल ७५ देशांतील स्पर्धक सहभागी झाले होते. कडव्या स्पर्धेला सामोरे जाताना जिद्द, आत्मविश्वास, दुर्दम्य इच्छाशक्ती, नियमित सराव, शिस्त आणि आंतरिक प्रेरणेच्या जोरावर त्यांनी ३५ ते ४५ वर्षे वयोगटात सुवर्णपदक पटकावले.

त्यांच्या या ऐतिहासिक यशामुळे भद्रावती शहराची मान उंचावली असून युवा पिढीसमोर प्रेरणादायी आदर्श निर्माण झाला आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून चिकाटी आणि मेहनतीच्या बळावर जागतिक स्तरावर यश मिळवता येते, हे डॉ. पूजा देऊरकर यांनी आपल्या कामगिरीतून सिद्ध करून दाखवले आहे.

डॉ. पूजा देऊरकर यांच्या या अभूतपूर्व यशाबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0