प्राणघातक हल्ल्यातील आरोपी २४ तासांत जेरबंद; दोन विधी संघर्षित बालके ताब्यात

Jun 16, 2026 - 13:26
 0  0
प्राणघातक हल्ल्यातील आरोपी २४ तासांत जेरबंद; दोन विधी संघर्षित बालके ताब्यात

प्राणघातक हल्ल्यातील आरोपी २४ तासांत जेरबंद; दोन विधी संघर्षित बालके ताब्यात

अमरावती | 16 जून 2026

फ्रेजरपुरा पोलिसांनी प्राणघातक हल्ल्याच्या गंभीर गुन्ह्यातील मुख्य आरोपीला अवघ्या २४ तासांत अटक करत दोन विधी संघर्षित बालकांनाही ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 12 जून रोजी रात्री सुमारे 10.45 वाजता चपराशीपुरा रोडवरील जेल क्वार्टरसमोर गुपचूप गाडीवर उभ्या असलेल्या युवकाकडे तिघांनी खर्चासाठी पैशांची मागणी केली. पैसे देण्यास नकार दिल्यानंतर वाद वाढला आणि दोन विधी संघर्षित बालकांनी धारदार शस्त्राने हल्ला करून युवकाला गंभीर जखमी केले. हल्ल्यात छाती, पोट, कंबर व खांद्याजवळ वार करण्यात आल्याने पीडित गंभीर जखमी झाला.

या प्रकरणी फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात अप. क्र. 473/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम 109(1) व 3(5) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपी रिजवान खान उर्फ छोटू शमी खान (वय 25, रा. चमन शहावली, अमरावती) याला विद्यापीठ परिसरातून ताब्यात घेतले. चौकशीत त्याने दोन्ही विधी संघर्षित बालकांसह गुन्ह्याची कबुली दिली. दरम्यान, पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोन्ही बालकांनाही सुपर हायवे परिसरातून ताब्यात घेण्यात आले.

मुख्य आरोपीला अटक करण्यात आली असून दोन्ही विधी संघर्षित बालकांना बाल न्याय मंडळासमोर हजर करण्यात आले आहे. पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपायुक्त यशवंत सोळंके, सहायक पोलीस आयुक्त कैलास फुंडकर आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र राजुलवार यांच्या मार्गदर्शनाखाली फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याच्या डी.बी. पथकाने केली.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0