सरोज चौकात अल्पवयीन विद्यार्थिनीची छेडछाड; विकृत आरोपीला सिटी कोतवाली पोलिसांनी केली अटक
सरोज चौकात अल्पवयीन विद्यार्थिनीची छेडछाड; विकृत आरोपीला सिटी कोतवाली पोलिसांनी केली अटक
अमरावती, दि. ८ जून : शहरातील सरोज चौक परिसरात अल्पवयीन विद्यार्थिनीशी अश्लील टिप्पणी करून तिचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला सिटी कोतवाली पोलिसांनी अटक केली आहे. अवघ्या काही दिवसांत आरोपीचा शोध घेत त्याच्यावर कारवाई करण्यात आल्याने पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक होत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंचवटी रोड येथील गर्ल्स औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) शिक्षण घेणारी पीडित विद्यार्थिनी ४ जून रोजी दुपारी वर्ग संपल्यानंतर घरी जाण्यासाठी सरोज चौक येथील ऑटोस्टँडवर आली होती. गावाकडे जाणाऱ्या ऑटोमध्ये ती बसलेली असताना सुमारे ३० वर्षीय एका अनोळखी इसमाने तिच्याशी संवाद साधत अत्यंत अश्लील व लज्जास्पद टिप्पणी केली.
अचानक घडलेल्या या प्रकारामुळे विद्यार्थिनीला धक्का बसला. मात्र तिने धाडस दाखवत संबंधित व्यक्तीला फटकारले. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून निघून गेला. विद्यार्थिनीने हा प्रकार तात्काळ आपल्या वडिलांना सांगितला. त्यानंतर सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0